अन् मी देवबापाले प्रार्थना करीन, अन् तो तुमाले एक मदत करणारा देईन, कि तो सर्वदा तुमच्या संग राहावा.” तो तर पवित्र आत्मा हाय, जो देवाच्या बाऱ्यात सर्व खरं सांगतो, ज्याले जगातले लोकं स्वीकार नाई करू शकत, कावून कि ते त्याले पाऊ शकत नाई अन् त्याले ओयखत पण नाई: पण तुमी त्याला ओयखता, कावून कि तो तुमच्या संग रायते, अन् तो तुमच्याईत रायते.