युहन्ना 15
15
खरा अंगुराचा वेल
1येशूनं म्हतलं, “खरा अंगुराचा वेल मी हाय; अन् माह्या देवबाप शेतकरी हाय. 2अन् हरएक डांग जे माह्यात जुडलेली हाय, जे डांग फळ देत नाई, त्याले तो कापून टाकते, अन् जे फळ देते, त्या डांगाची तो छाटणी करते, कि आणखी फळ यावे. 3तुमी तर त्या शिकवणी मुळे जे मी तुमाले सांगतली हाय, तुमची छाटणी झाली हाय. 4तुमी माह्यात बनून राहा, अन् मी तुमच्यात बनून राईन. जशी डांग जर अंगुराच्या वेलीत जुडून नाई राईन, तर स्वता फळ आणू नाई शकत, तसचं जर तुमी माह्यात बनून नाई रायसान तर काई पण चांगलं करू शकत नाई. 5मी अंगुराचा वेल हाय: तुमी डांगा हा; जो माह्यात बनून रायते, अन् मी त्याच्यात बनून रायतो, तो खूप फळ आणते, कावून कि माह्यापासून वेगळ होऊन तुमी काई पण नाई करू शकत. 6जर कोणी माह्यात बनून नाई राईन, तर देवबाप त्याले कापून फेकून देतो; जवा त्या डांगा सुकून जातात, तर त्यायले एकत्र करून जाळून टाकलं जाईन. 7जर तुमी माह्यात बनून रायसान, अन् माह्यी शिकवण तुमच्यात बनून राईन, तर जे काई तुमी बापाले मांगसान तो तुमच्यासाठी करीन. 8माह्या बापाचा गौरव यानेच होते, कि तुमी लय फळ देलं पायजे, तवा तुमी माह्याले खरे शिष्य होसान. 9जसं देवबापान माह्यावर प्रेम केलं, तसचं मी पण तुमच्यावर प्रेम केलं, माह्या प्रेमात बनून राहा. 10जर तुमी माह्या आज्ञा माणसानं, तर माह्या प्रेमात बनून रायसान, जसा मी आपल्या देवबापाच्या आज्ञा मानली हाय, अन् त्याच्या प्रेमात बनून रायतो. 11मी ह्या गोष्टी तुमाले यासाठी म्हतल्या, कि तुमच्यात पण तो आनंद राहो, जो माह्यात हाय, अन् तुमी पूर्ण पणे आनंदित झाले पायजे.”
शिष्यायचे एकादुसऱ्या प्रेम
12“माह्याली आज्ञा हे हाय, कि जसा मी तुमच्यावर प्रेम केलं, तसचं तुमी पण एकमेकावर प्रेम करा.” 13“कोणाच्या पासी हे दाखव्यासाठी कि तो आपल्या दोस्ताईवर प्रेम करतो, याच्या पेक्षा आणखी काई मोठा उपाय नाई हाय, कि तो त्यायले वाचव्यासाठी आपला जीव पण देऊन देते. 14जे काई मी तुमाले आज्ञा देतो, जर त्याले मानानं तर तुमी माह्याले दोस्त हा. 15आतापासून मी तुमाले दास नाई म्हणनार, कावून कि दासाले मालूम नाई, कि त्याचा मालक काय करते: पण मी तुमाले दोस्त म्हतलं हाय, कावून कि जे सुवार्था मी आपल्या देव बापापासून आयकली ते सगळी तुमाले सांगतली. 16तुमी मले नाई निवडलं, पण मी तुमाले निवडलं हाय, अन् तुमाले पाठवलं पण हाय, कि तुमी जाऊन फळ आना; अन् तुमचे फळ आखरी परेंत टिकून राहावा, कावून कि तुमी माह्ये शिष्य हा, तुमी माह्या नावान जे काई देवबापाले मांगसान तो तुमाले देईन. 17या गोष्टीची आज्ञा मी तुमाले याच्यासाठी देतो, कि तुमी एकामेकावर प्रेम करा.”
जगातून सताव
18“जर जगाचे लोकं तुमचा द्वेष करतात, तर तुमाले मालूम हाय, कि त्यायनं तुमच्या आगोदर माह्या संग पण द्वेष केला होता. 19जर तुमी जगाच्या लोकायसारखे असते, तर जगातल्या लोकायन तुमच्यावर प्रेम केलं असतं, पण कावून कि तुमी जगातल्या लोकायसारखे नाई, पण मी तुमाले जगातल्या लोकायतून निवडल्या गेलं हाय; म्हणून जग तुमचा द्वेष करते. 20जे मी तुमाले सांगतल हाय, दास आपल्या मालकावून मोठा नाई रायत, त्याले आठवण ठेवा, जर त्यायनं मले सतावल, तर तुमाले पण सतावतीन; जर त्यायनं माह्या शिकवणीचे पालन केले, तर ते तुमच्या पण शिकवणीचे पालन करतीन. 21पण हे सगळे लोकं, तुमी माह्याले शिष्य हा म्हणून, तुमच्या सोबत करतीन, कावून कि ते माह्या पाठवणाऱ्या देवाले नाई ओयखत. 22जर मी आलो नसतो, तर त्यायच्या संग गोष्टी नाई केल्या असत्या, तर ते पापी नाई ठरले असते, पण आता त्यायले त्यायच्या पापासाठी कोणताच बायना सांगता येत नाई. 23जो माह्या द्वेष करतो, तो माह्या देवबापाचा पण द्वेष करतो. 24जर मी त्यायच्यात ते चमत्काराचे काम नाई केले असते, जे आणखी कोणी नाई केले, तर ते पापी नाई ठरले असते, पण आता तर त्यायनं मी जे काई चमत्काराचे काम केले ते पायले, तरी पण त्यायनं माह्या अन् माह्या देवबापाचा पण द्वेष केला हाय. 25अन् हे त्या वचनाले पूर्ण करते जे नियमशास्त्रात लिवलेल हाय; तो म्हणते, कि त्यायनं कारण नसतांना माह्या द्वेष केला. 26-27मी देवबापाच्या इकून तुमच्यासाठी एक मदत करणारा पाठवीन, हा तो आत्मा हाय जो देवबापाच्या इकून येईन, अन् खरं हाय तेच प्रगट करीन; जवा तो येईन, तवा तो तुमाले माह्या बाऱ्यात सांगीन; अन् तुमी जगातल्या लोकायले माह्या बाऱ्यात सांगान, कावून कि तुमी सुरुवाती पासून माह्या संग रायले हा.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.