युहन्ना 13

13
प्रभू भोज
1फसह सणाच्या पयले, जवा येशूनं समजलं, कि, माह्या तो वेळ आला हाय, कि जग सोडून देवबापाच्या पासी वापस जाऊ. तवा तो जगात रायनाऱ्या आपल्या लोकायवर जे जगात होते, जसा प्रेम करत होता, तसाच तो शेवट परेंत प्रेम करत रायला. 2जवा येशू अन् त्याचे शिष्य रात्रीचे जेवण करत होते, सैतानाने पयले पासूनच येशूला धोका देण्यासाठी शिमोनाचा पोरगा म्हणजे यहुदा इस्कोरोतीचा मनात हे गोष्ट टाकली होती, कि त्याले पकडावं 3येशूला हे मालूम होतं कि देवबापान सगळं काई त्याच्या हातात देलं हाय, अन् हे कि तो देवाच्या पासून आला हाय, अन् देवाच्या पासी वापस जाऊन रायला हाय. 4जेवण करतांना उठून आपले अंगावरचा झगा काढला, अन् दुपट्टा घेऊन आपली कमर बांधली.
येशू शिष्याचे पाय धुते
5तवा भांड्यात पाणी घेऊन शिष्यायचे पाय धुतले, अन् जो दुपट्टा कमरीले बांधला होता त्याचं दुपट्यानं एका दासा सारखे पुसू लागला. 6जवा येशू शिमोन पतरसच्या पासी आला, तवा पतरसन त्याले म्हतलं, “हे प्रभू, काय तू माह्याले पाय धूते?” 7येशूनं त्याले उत्तर देलं, “जे मी करतो, तू त्याचा अर्थ आता नाई समजत, पण याच्या बाद समजशीन.” 8पतरसन त्याले म्हतलं, “तू माह्याले पाय कधीच धुशीन नाई!” हे आयकून येशूनं त्याले म्हतलं, “जर मी तुह्ये पाय नाई धुईन तर तू माह्या शिष्य नाई हाय.” 9शिमोन पतरसन येशूले म्हतलं, “हे प्रभू, तर माह्ये पायच नाई, पण हात अन् डोकं पण धुऊन टाक.” 10येशूनं त्याले म्हतलं, “एक माणूस ज्यानं आंघोळ केली हाय, त्याले आपल्या पायाच्या शिवाय काईच धुयाची आवशक्ता नाई; त्याचं सगळं शरीर साफसूत्रे हाय: अन् फक्त एकाले सोडून तुमी सगळे साफसूत्रे हा.” 11तो तर आपल्या पकडणाऱ्याले ओयखत होता, म्हणून त्यानं म्हतलं, “फक्त एकाले सोडून तुमी सगळे पवित्र हा.”
पाय धुण्याचा अर्थ
12जवा येशूनं त्यायचे पाय धुतले अन् आपला झगा घालून परत बसला, तवा त्यायले म्हणू लागला, “काय तुमी समजले कि मी तुमच्या संग काय केलं? 13तुमी मले गुरुजी, अन् प्रभू म्हणता, अन् जे तुमी म्हणता ते बरोबर हाय, कावून कि मी तुमचा गुरु अन् प्रभू हाय. 14जर मी प्रभू अन् गुरु असून तुमचे पाय धुतले; तर तुमाले पण नम्र होऊन एकामेकाचे पाय धुतले पायजे. 15कावून कि मी तुमाले उदाहरण करून दाखवलं हाय, कि जसं मी तुमच्या संग केलं हाय, तुमी पण तसचं करत जा. 16मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि एका शिष्याले त्या सेवा कार्याला करताने खूप महत्वपूर्ण समजलं नाई पायजे, जे त्याच्या प्रभूच्या व्दारे केले हाय, अन् नाई तर त्याले आपल्या प्रभूच्या बराबरीत जगाच्या पेक्षा आणखी व्यहाराची आशा केली पायजे. 17आता जर तुमाले ह्या गोष्टी मालूम हायत, तर त्या करा, कि तुमी आशीर्वादित होऊन जासान. 18मी तुमच्या सगळ्यायच्या विषयात नाई म्हणत: ज्यायले मी निवडले हाय, त्यायले मी ओयखतो; पण असं यासाठी होतं हाय, कावून कि पवित्रशास्त्रात जे लिवलेल हाय ते खरं व्हावं, ज्यानं माह्या संग भाकर खाल्ली त्यानचं मले धोका देला हाय. 19आता मी असं घडण्याच्या पयले, तुमाले सांगतो, ह्या साठी कि जवा हे घडीन तवा तुमी विश्वास करजा, कि मी तोच हाय. 20मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो माह्या पाठवणाऱ्याले स्वीकार करतो, तो मले स्वीकार करते, अन् जो माह्या स्वीकार करतो, माह्या पाठवणाऱ्याले स्वीकार करते.”
येशू आपला विश्वासघात करणारा दाखवतो
21ह्या गोष्टी म्हतल्यावर येशू आत्म्यात व्याकूळ झाला, अन् आपल्या शिष्यायले सांगतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि तुमच्या पैकी एक मले पकडून देईन.” 22तो कोणाच्या बाऱ्यात बोलतो या संशयाने येशूचे शिष्य एकामेकाकडे पाऊ लागले. 23येशूच्या शिष्यायतून एक ज्याले येशू प्रेम करत होता, येशूच्या बाजूनं जाऊन बसला. 24तवा शिमोन पतरसने त्याच्याइकडे इशारा देऊन विचारलं, “सांग बरं, तो कोणाच्या बाऱ्यात म्हणतो?” 25तवा त्यानं येशूच्या जवळ जाऊन विचारलं, “हे प्रभू, तो कोण हाय?” येशूनं उत्तर देलं, “ज्याले मी हा भाकरीचा तुकडा चटणीत डुबून देईन, तोच हाय.” 26अन् येशूनं भाकरीचा तुकडा डूबवून शिमोनाचा पोरगा यहुदा इस्कोरोतीला देला. 27अन् जसा यहूदाने भाकरीचा तुकडा घेतल्या नंतर येशूनं त्याले म्हतलं, “तू जे करायले चालला हाय, ते काम लवकर कर.” त्यावाक्ती सैतान यहुदाच्या अंदर घुसला. 28पण जेवणासाठी बसलेल्या दुसऱ्या शिष्याय पैकी कोणालेच मालूम नाई होतं कि येशूनं त्याले असं कावून म्हतलं. 29यहुदाच्या इस्कोरोती पासी पैशाची थैली रायत होती, म्हणून कोणा-कोणा शिष्यायले वाटलं, कि येशू यहुदा इस्कोरोतीले म्हणून रायला, कि जे काई आमाले सणासाठी पायजे ते विकत घे, किंवा हे कि गरीबायले काई तरी दे. 30तवा तो भाकरीचा तुकडा खायाच्या बाद यहुदा इस्कोरोती लवकर बायर चालला गेला, ती वेळ रात्रीची होती.
एक नवीन आज्ञा
(मत्तय 26:31-35; मार्क 14:27-31; लूका 22:31-34)
31जवा यहुदा बायर चालला गेला, तवा येशूनं म्हतलं, “आता माणसाच्या पोराचा गौरव झाला, अन् देवाचा गौरव त्याच्या व्दारे झाला; 32जर त्याच्यापासून देवाचा गौरव झाला, तर देव पण स्वता आपल्या पोराचा गौरव करीन, अन् लवकर करीन. 33हे माह्या प्रियांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्या संग हावो: मंग तुमी मले पायसान, अन् जसं मी यहुदी पुढाऱ्यायले म्हतलं, कि जती मी जात हाय, तती तुमी नाई येऊ शकत, तसचं मी आता तुमाले पण सांगतो. 34मी तुमाले एक नवीन आज्ञा देतो, कि एकामेकावर प्रेम करा, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसचं तुमी पण एकामेकावर प्रेम करा. 35जर तुमी एकामेकावर प्रेम करसान, तर हरएकाला मालूम होईन कि तुमी माह्याले शिष्य हा.”
येशू पासून पतरसच्या नकाराची भविष्यवाणी
36शिमोन पतरसन येशूले विचारलं, “तू आता माह्या संग येऊ शकत नाई; पण याच्या बाद माह्या मांग येशीन.” 37पतरसन त्याले म्हतलं, “हे प्रभू, आता मी तुह्या मांग कावून नाई येऊ शकत? मी तर तुह्यासाठी जीव देयाले पण तयार हावो.” 38येशूनं उत्तर देलं, “काय तू माह्यासाठी मरशीन? मी तुले खरं-खरं सांगतो, कि कोंबड्याच्या बाग दियाच्या पयले, तू तीन वेळा म्हणसीन कि मी याले ओयखत नाई.”

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录