एकवेळी जवा तो शिष्यायच्या सोबत होता, तवा शिष्यायले भेटून त्यायले आज्ञा देली, “यरुशलेम शहराले सोडून जाऊ नका, पण त्या दानाची प्रतीक्षा करा, जे माह्याल्या देवानं तुमाले देण्याचा वादा केला होता, तुमी मले त्याच्या विषयात बोलतांना आयकलं होतं. कावून कि, योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने तर पाण्यात बाप्तिस्मा देला, पण थोड्यादिवसानंतर देव तुमच्या बरोबर रायण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविन.”