अन् एकाएक स्वर्गातून मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा शब्द आला, अन् त्या शब्दाने सारे घर जती ते बसले होते खूप घुमला. अन् त्यायले आगीच्या सारख्या जिभा अलग होतं असलेल्या दिसल्या, अन् त्यायच्यातून हरएकावर येऊन थांबल्या. अन् ते सगळे पवित्र आत्म्यात भरपूर झाले, अन् जसा-जसा आत्मा त्यायले बोल्याचं सामर्थ देत होता, तसे ते अलग-अलग भाषेत बोलायले लागले.