ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकाSample
जसे आपण सतत वाचत जातो, येशूची चळवळ अधिक वेगाने वाढताना आपण पाहतो, जसे दुसऱ्या देशातील ज्यू समाजाने येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केलेली आहे. जशी त्यांना पवित्र आत्म्याची ऊर्जा मिळाली, त्यांचे जीवन बदलले, आणि त्या समुदायाने पूर्णपणे एका वेगळ्या मार्गावर, संपूर्ण आनंद आणि औदार्याने जगणे सुरु केले. ते रोज एकत्र जेवत, एकमेकांबरोबर प्रार्थना करीत, आणि स्वतःच्या वस्तू विकून त्यांच्यामधील गरिबांच्या गरजा पूर्ण करीत. एका नवीन कराराच्या खाली जगण्याचा काय अर्थ असतो हे ते शिकतात, जिथे देवाचे अस्तित्व मंदिरांच्या ऐवजी माणसांमध्ये असते.
दोन पाद्री जे मंदिरामध्ये देवाचा अपमान करतात आणि अचानक त्यांना मृत्यू येतो या लेव्हिटिकसच्या पुस्तकातील अशा विचित्र गोष्टीबद्दल तुम्हाला कदाचित माहित असेल. आजच्या निवडक वाचनात, ल्यूक पवित्र आत्म्याच्या मंदिराचा अनादर करणारे दोन व्यक्ती आणि त्यांना मरण येते अशा लोकांबद्दलच्या समान गोष्ट सांगतो. शिष्यांसाठी ही धोक्याची घंटा होती. या नवीन कराराचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येऊन त्यांना धोक्याची सूचना मिळाली, आणि नवीन मंदिरातील भ्रष्टाचार नष्ट केला गेला. परंतु, धार्मिक मंदिरांचे नेते येशूच्या अनुयायांच्या आणि त्याच्या संदेशाच्या विरोधात लढत असल्या कारणाने जुन्या मंदिरातील भ्रष्टाचार तसाच राहिला आहे. मुख्य पाद्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रेषितांनी इतकी धमकी दिली की त्यांनी प्रेषितांना तुरुंगात टाकले, पण देवदूताने त्यांना तुरुंगातुन बाहेर काढले आणि त्यांना मंदिरात जाऊन येशूच्या राज्याचे संदेश पसरविण्याचे काम सुरु ठेवावे असे सांगितले. धर्मगुरूंनी आग्रह धरला की प्रेषितांनी येशूविषयी संदेश देणे थांबवावे, परंतू प्रेषितांनी तसे केले नाही. यावर, धर्मगुरू प्रेषितांना जीवानिशी मारण्यासाठी तयार होते, पण गमलिएल नामक व्यक्तीने वादविवाद करून त्यांना असे करण्यापासून थांबवले की जर त्यांचा संदेश हा देवाचा आहे, कोणीही त्यांना काढून टाकू शकणार नाही.
About this Plan
ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More