YouVersion Logo
Search Icon

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकाSample

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

DAY 30 OF 40

अँटिऑकमधून बाहेर पडल्यानंतर पॉल आणि बर्नाबास यांनी येशूच्या राज्याच्या शुभ वार्तेसह इकॉनियम शहरामध्ये प्रवास केला. त्यांच्या संदेशावर काही जणांनी विश्वास ठेवला, पण ज्यांनी याला नाकारले त्यांनी यांच्या विरोधात सक्रियपणे अडचणी निर्माण करण्यास सुरुवात केली. गोष्टी इतक्या टोकाला गेल्या कि संपूर्ण शहर या मुद्द्यावर विभागले गेले. आणि जेव्हा आपल्या विरुद्ध मृत्यूच्या धमक्या दिल्या जात आहेत हे शिष्यांना समजले, ते लाइकोनिया, लिस्त्रा, डर्बे, आणि आसपासच्या भागांमध्ये गेले. 


लिस्त्रामध्ये असताना पॉल अशा एका व्यक्तीला भेटला जो याआधी कधीच आला नव्हता. जेव्हा पॉलने येशूच्या शक्तीने त्या व्यक्तीला बरे केले, लोकांचा असा गैरसमज झाला की तो ग्रीक देवता आहे आणि त्यांना भेटण्यासाठी आला आहे, त्यामुळे त्यांनी याची आराधना करण्याचा प्रयत्न केला. पॉल आणि बर्नाबास लोकांचा गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नात होते, आग्रहाने हे सांगत होते की, खरा ईश्वर एकच आहे आणि ते त्याचे सेवक आहेत. पण लोकांना हे समजले नाही, आणि पॉल आणि बर्नाबासच्या शत्रूंनी पॉलला जीवे मारून टाका असे सांगितल्यावर त्यांनी लगेचच मान्य केले.   तो बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी पॉलवर दगडफेक केली.  तो मृत्युमुखी पडला आहे असे गृहीत धरून त्यांनी त्याचे शरीर ओढत लिस्त्रा शहराच्या बाहेर टाकले. पॉलचे मित्र त्याच्या भोवती जमा झाले आणि त्याला उभं राहताना आणि शहरामध्ये परत जाताना पाहून आश्चर्यचकित झाले. दुसऱ्या दिवशी, पॉल आणि बर्नाबास येशूच्या शिकवणीचे उपदेश देण्यासाठी डर्बे इथे गेले आणि  प्रत्येक चर्चसाठी नवीन नेते नियुक्त करण्यासाठी आणि ख्रिस्तींनी कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लिस्त्रा आणि आसपासच्या भागांमध्ये लगेच परत आले. 


Scripture

Day 29Day 31

About this Plan

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More