YouVersion Logo
Search Icon

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकाSample

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

DAY 29 OF 40

पहिल्या शतकाच्या काळामध्ये, भूमध्य प्रदेशाच्या आसपास राहणारे लोक रोमन साम्राज्याची सत्ता असलेल्या दाटीवाटीच्या शहरांमध्ये राहत होते. प्रत्येक शहर हे संस्कृती, जाती, आणि धर्म याचे वैविध्यपूर्ण मिश्रण होते. या कारणाने, तिथे सर्व प्रकारच्या देवांसाठी त्याग करणारी सर्व प्रकारची मंदिरे होती, आणि प्रत्येक व्यक्तीचा वेगळा देव होता ज्याला तो त्याची निष्ठा देत असे. पण प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला अल्पसंख्यांक गटही दिसतील जे या देवांना त्याची श्रद्धा अर्पण करीत नसत.  हे इस्त्रायली लोक, जे ज्यू नावाने ओळखले जात, दावा करतात की, एकच खरा देव आहे, आणि ते त्या एकट्याचीच उपासना करीत होते.  


रोमन साम्राज्याने बांधलेल्या रस्त्यांच्या जाळ्यांनी ही सगळी शहरे जोडलेली होती, त्यामुळे व्यवसायासाठी इतरत्र फिरणे आणि नवीन कल्पनांचा प्रसार करणे सोपे होते.  प्रेषित पॉल यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य हे सगळ्या देशांवर इस्त्राईलच्या ईश्वराने नियुक्त केलेला नवीन राजा, जो शक्ती आणि आक्रमकता यांनी राज्य करीत नाही तर आत्मत्यागी प्रेमाने करतो याची घोषणा करीत या रस्त्यांवर प्रवास केला. पॉलने या बातमीचा राजदूत म्हणून काम केले जसे तो राजा येशूच्या प्रेमळ अधिपत्याखाली सर्व लोकांना येण्याचे आमंत्रण देत होता.  


पॉलच्या प्रवासाच्या गोष्टी आणि त्याचा संदेश लोकांनी कसा स्वीकारला याबद्दल एक्ट्सचा तिसरा भाग आहे. या भागामध्ये, ल्यूक आपल्याला दाखवतो की कशा प्रकारे पॉल आणि त्यांचे सहकारी त्यांच्या घरापासून, अँटिऑक शहरापासून दूर जाऊन, आणि साम्राज्यभर मुख्य शहरांमध्ये फिरत होते.  प्रत्येक शहरामध्ये, पहिल्यांदा ज्यूंच्या सभागृहामध्ये जाऊन त्याच्या माणसांना येशू कशी  हिब्रू बायबलची  मेसॅनिक परिपूर्ती करतो हे सांगणे ही पॉलची पद्धत होती. काहीजण त्याच्या या संदेशावर विश्वास ठेवत आणि येशूच्या शासनाखाली येत, पण इतर पॉलच्या या संदेशाचा विरोध करीत. काही ज्यू लोकांना मत्सर वाटू लागला आणि ते शिष्यांवर खोटे आरोप करू लागले, तर काही ज्यू नसलेल्या लोकांना रोमन जगण्याचा मार्ग हा धमकी देणारा आणि शिष्यांना दूर नेणारा वाटत होता. पण विरोधाने येशूची ही चळवळ कधीच थांबली नाही. वास्तविक, हा छळ हे नवीन शहरांमध्ये पुढे चालवण्याचे खऱ्या अर्थाने काम करीत होता. संपूर्ण आनंदात आणि पवित्र आत्म्यामध्ये, शिष्य पुढे जात होते. 


Scripture

Day 28Day 30

About this Plan

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More