YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ख्रिस्ताचे अनुसरण करणेनमुना

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12 पैकी 6 दिवस

ज्याचे आपण अनुसरण करतो तो ठरवतो की आपण कुठे जातो

अनुसरण करण्याबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याचे अनुसरण करतो तो आहे. चमत्कार आपण त्याला अनुसरण्यात नाही तर तो कोण आहे यात आहे. आम्ही देवाचा पुत्र येशू,देहधारी परमेश्वर याचे अनुसरण करतो. जेव्हा त्याने आपल्या पहिल्या शिष्यांची निवड केली तेव्हा त्याने स्वतःला भाकरी वाढवणारा,वादळ थांबवणारा,पाण्यावर चालणारा,सोडविणारा,बरे करणारा आणि शिक्षक म्हणून दाखवले. लोकांना त्याची नितांत गरज का आहे हे लोकांना समजावे म्हणून येशूने स्वतःला विविध नावे दिली,जरी त्यांना अद्याप माहित नव्हते तरी. तो म्हणाला की त्याने नियमशास्त्र पूर्ण केले,तो स्वर्गातून आलेली भाकर,जिवंत पाणी,दार,उत्तम मेंढपाळ,जगाचा प्रकाश,मार्ग,सत्य आणि जीवन आहे.

आज,आपण त्याच देवाचे अनुसरण करतो परंतु आपण त्याला जेवढे शिष्य जाणत होते त्यापेक्षा तो कितीतरी जास्त असल्याचे जाणतो. तो सर्व पृथ्वीचा येणारा राजा आणि न्यायाधीश आहे. तो सिंह आणि कोकरू आहे.

तो जगाचा तारणारा आणि मुक्तिदाता आहे. तो मरणातून जिवंत होणारा प्रथम फळ असा आहे आणि पाप व मृत्यूवर त्याने विजय मिळविला आहे. तो सनातन पिता आणि सत्याचा आत्मा आहे. तो आमचा सतत सोबती आहे जो आमच्यामध्ये वस्ती करतो,खातरी करून देतो,सल्ला आणि सांत्वन देतो.

आपल्यापैकी प्रत्येकजण देवाच्या चारित्र्याकडे झुकतो ज्याच्याशी आपण सर्वात जास्त संबंध ठेवतो आणि ज्याच्याशी आपल्याला सर्वात आरामदायक वाटते पण ख्रिस्ताला अनुसरण्याचा हा प्रवास रोमांचक आहे कारण आपल्याला त्याच्या सर्व आश्चर्यकारक विशालतेमध्ये देवाचा अनुभव घेता येतो!

तो पवित्रतेत भव्य आहे.

तो आनंदाने अप्रत्याशित आहे.

तो प्रचंड सामर्थ्यवान आहे.

तो अमर्यादपणे सर्जनशील आहे.

तो त्याच्या तारणाच्या धोरणांमध्ये आणि त्याच्या पुनर्स्थापनेच्या उपायांमध्ये अत्यंत कल्पक आहे.

त्याला आपल्या लहान मेंदूने आणि मर्यादित कल्पनाशक्तींद्वारे प्रतिबंधित,नियंत्रित किंवा मर्यादित केले जाऊ शकत नाही.

त्याने निर्माण केलेल्या जगावर तो अमर्यादपणे प्रेम करतो.

जे त्याच्यापासून दूर गेले आहेत त्यांचा पाठलाग करण्यात तो अथक आहे.

येशूने आपल्याला दिलेली महान आज्ञा मूळतः अनुवादातून घेतली होती जी म्हणते, ”हे इस्राएला,श्रवण कर;आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे.“आपल्या मर्यादित अनुभवाच्या आधारे देवाला केवळ आपला आरोग्य देणारा किंवा तरतूद करणारा म्हणून विभाजित करणे खूप सोपे आहे परंतु तो आम्हास कल्पना करता येईल त्यापेक्षा खूप जास्त आहे. हा महान,बहुआयामी,अत्यंत अद्भुत देव एक आहे. येशूचे अनुयायी या नात्याने,तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक ऋतूत त्याचे सर्व अनुभव प्राप्त करता येतात. एका हंगामात,तुम्ही त्याला बरे करणारा म्हणून दाखवण्याची अपेक्षा करत असाल परंतु तो कदाचित पुनर्स्थापन करणारा म्हणून दिसेल. तुम्हाला तरतूद करणार्याची गरज असू शकते परंतु तुम्हाला प्रत्येक परिस्थितीची पूर्तता करण्याची त्याची क्षमता दिसून येईल. आपल्या अपेक्षेप्रमाणे देव प्रकट झाला नाही तेव्हा आपल्या प्रवासात आपल्याला कधीकधी निराशा अनुभवास येते. कदाचित वेळ आली आहे की तुम्ही देवाला तुमचे आध्यात्मिक डोळे उघडण्यास विनंती करावी जेणेकरून तो सध्या तुमच्या जीवनात कसा वाटचाल करत आहे हे त्याने तुम्हाला दाखवावे. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा तुम्हाला सोडणार नाही हे त्याचे अभिवचन तो पाळतो.

घोषणा: मला माहीत आहे की देव माझ्या जीवनात कार्य करीत आहे.

दिवस 5दिवस 7

या योजनेविषयी

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: instagram.com/wearezion.in