ख्रिस्ताचे अनुसरण करणेनमुना

संपूर्ण मनाने त्याचे अनुसरण करा
आमची अंतःकरणे खूप विभाजित असतात. आमचे प्रेम आणि निष्ठा नैसर्गिकरित्या कुटुंब,काम,मित्र,छंद आणि काहीवेळा खाद्यवस्तूंमध्ये विभाजित असते. यापैकी काहीही चुकीचे नसले तरी,ज्याने आपल्याला या सर्व गोष्टी दिल्या त्यापासून ते कधीकधी आपले प्रेम आणि स्नेह हिरावून घेऊ शकतात. जेव्हा आपण येशूचे अनुसरण करतो,तेव्हा आपल्याला आपल्या अंतःकरणाचे पूर्ण पुनर्स्थापन करण्याची गरज भासते जेणेकरून आपल्याला प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्यासाठी जागा तयार करता यावी. यिर्मया संदेष्टा म्हणतो की हृदय सर्वात कपटी आहे,म्हणून आपण त्याचे रक्षण केले पाहिजे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. प्रत्येक इच्छेच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या जागी देवाला संतुष्ट करण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा आणि महत्त्वाकांक्षा कधीही चुकीच्या नसतात जेव्हा त्यांना त्यांचे स्थान ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित असलेल्या अंतःकरणात मिळते. कराराच्या देशात हेरगिरी करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या इतर दहा इस्राएली लोकांत कालेब आणि यहोशवा देवासमोर उठून दिसले. त्यांच्या देवाप्रत असलेल्या अखंड आणि मनःपूर्वक भक्तीमुळे ते उठून दिसले. त्यांची अंतःकरणे देवाच्या आज्ञा पाळण्यावर केंद्रित असल्याने,तो त्यांना जेथे नेई तेथे ते निर्भय होते,त्याच्यासाठी त्यांना काही दानवांचा सामना करावा लागला तरीही.
जर आपली अंतःकरणे येशूचे अनुसरण करण्यास पूर्णपणे वचनबद्ध असतील,तर देव आणि त्याच्या राज्याच्या कार्यासाठी आमच्या उत्कटतेने आणि आवेशाने ते दृश्यमान होईल. देवाच्या गोष्टी आणि या जगाच्या गोष्टीं यांत विभाजित स्नेहांमध्ये अधूरे हृदय दिसून येईल. ज्या संकट समयात आपण राहत आहोत त्यातील आणखी एक समस्या म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल कठोर अंतःकरण बाळगणे. अशा प्रकारचे हृदय असलेले लोक असे आहेत जे त्यांच्या कित्येक प्रश्नांची उत्तरे सापडत नसल्यामुळे देवाच्या स्पर्शाप्रत असंवेदनशील असतील आणि शेवटी ख्रिस्ताचे अनुसरण करणे सोडून देतील. दुसरीकडे,मृदू अंतःकरण असलेले असे आहेत जे देवाच्या स्पर्शाप्रत नम्य आहेत आणि तो त्यांच्यात आणि त्यांच्या आजूबाजूला करत असलेल्या गोष्टींबद्दल ग्रहणशील आहेत. आपली पहिली प्रीती,येशू याच्यासाठी आपल्या अंतःकरणात जागा बनवणे यास आपल्या जीवनात सर्वाेच्च प्राधान्य असले पाहिजे.
घोषणा: मी माझ्या हृदयाचे रक्षण करीन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: instagram.com/wearezion.in