YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ख्रिस्ताचे अनुसरण करणेनमुना

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12 पैकी 5 दिवस

अनुसरण करणे म्हणजे आरोग्य प्राप्त करणे

येशूच्या पृथ्वीवरील सेवेत रोग्यांस आणि पीडितांस बरे करणे मोठ्या प्रमाणात शामिल होते. शुभवर्तमानाची पुस्तके सांगतात की येशूने कशाप्रकारे त्याच्याजवळ येणार्या प्रत्येकास बरे केले. त्याला भेटणारा एकही व्यक्ती पूर्वीसारखा राहिला नाही. पवित्र शास्त्र हा देखील उल्लेख करते की त्याने प्रत्येक प्रकारचे रोग बरे केले. तो तेथेच थांबला नाही,पण त्याने दुरात्म्यांनी गांजवलेल्यांस देखील सोडविले ज्यामुळे ते भावनात्मकरित्या आणि मानसिकरित्या बंधनात होते. आज हे वेगळे नाही! येशू आजही त्याचे अनुसरण करणार्या आम्हा सर्वांना बरे करतो. आम्हाला ताबडतोब आरोग्य प्राप्त होत नसेल,पण आम्ही जशी कल्पना करतो तसे ते नसेल,पण तो नेहमीच त्या लोकांच्या मदतीस येतो जे त्याच्यावर प्रीती करतात आणि त्याचे अनुसरण करतात.

जेव्हा आम्ही या देवाचे अनुसरण करतो,तेव्हा आमच्या जीवनात अक्षरशः कायापालट होतो! तो आम्हाला नेहमीच्या मार्गावरून दूर नेतो आणि अशा मार्गावर नेतो ज्याची आम्ही कधी कल्पनाही केली नाही की आम्ही त्यावरून चालू. जीवनाच्या प्रवासात पुढे जात असतांना,आम्हाला असे आढळून येते की आराग्य हे असे नाही जे भौतिक क्षेत्रात घडून येते,पण सकल पातळीर घडून येते. आपण मनुष्य आपल्या अस्तित्वात इतके अद्भुुतरित्या जटिल आहोत की आपल्याकडे केवळ भौतिक शरीर नाही तर एक प्राण आणि आत्मा आहे जे एकमेकांशी गुंतागुंतीने जुळलेले आहेत. पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये राहतो आणि कार्य करतो तो नात्यात,भावनेत,शारीरिकरित्या,सर्जनशीलपणे,मानसिक आणि आध्यात्मिकरित्या बरे करतो. ही आरोग्यप्राप्ती जवळजवळ अगोचर आहे परंतु हळूहळू साकार रूपाने दिसू लागते जे केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या सभोवतालच्या लोकांना ओळखता येते! आज,आपल्याजवळ अशी एक कडा आहे जी येशूच्या काळातील लोकांजवळ नव्हती. हे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य आहे जे येशूच्या प्रत्येक अनुयायांसाठी उपलब्ध आहे. हे सामर्थ्य,जेव्हा आपल्या शरीरात,प्राणात आणि आत्म्यांमधून मार्गक्रमण करते,तेव्हा मृत झालेल्या प्रत्येक गोष्टीत जीवन आणते आणि आपल्याला स्वतः ख्रिस्ताच्या प्रतिरूपात बदलण्यास सुरवात करते. आपण पूर्वीसारखे कधीही नसतो कारण हळूहळू,दिवसेंदिवस,परिस्थितीनुसार,आतून बाहेरून बदलून जातो.

घोषणा: येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले!

दिवस6:मार्गाचे अनुसरण करण्याचा अर्थ तो सर्व वेळ आमच्यासोबत आहे

येशूचे अनुसरण करण्याचा अर्थ आपण रुंद मार्गाऐवजी अरुंद मार्ग स्वीकारतो. अरुंद मार्गाला असे योग्यच म्हटले जाते कारण त्यामध्ये देवाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करणे आणि त्याला मान मिळेल अशा प्रकारे जगण्याची निवड करणे समाविष्ट आहे. या मार्गासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही अधूनमधून तुमच्या स्वतःच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेसाठी मरावे आणि देव तुम्हाला जेथे नेतो तेथे त्याचे अनुसरण करावे लागेल. रूंद मार्ग म्हणजे असा मार्ग जेथे काहीही जाते. तुम्ही जशी निवड करता तसे जगू शकता,वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी योग्य वाटतील असे निर्णय घेऊ शकता आणि तुम्हाला प्रसन्नता देणारे निर्णय घेऊ शकता. येशू अगदी स्पष्टपणे बोलला जेव्हा त्याने त्याच्या अनुयायांना शिकवले की अरुंद दरवाजा सार्वकालिक जीवनाकडे नेतो आणि रूंद दरवाजा विनाशाकडे नेतो.

तथापि,मनोरंजक गोष्ट अशी आहे की येशू आपल्याला ज्या अरुंद मार्गावर पाचारण करतो तो एक महामार्ग आहे जेथे आश्चर्यकारक वळणे आणि फेरे आहेत,अपेक्षा नसलेले उंच आणि सखल भाग आहेत आणि असामान्य कोरडी क्षेत्रे आहेत आणि त्यानंतर हिरवागार परिसर आहे. जरी आपण जीवनाच्या गतिरोधांवर,रानातील मार्गांवर,कबरांवर किंवा उंच कडांवर उभे असू,तरी देव आपल्यासोबत आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही ऋतूत तो आपल्याला स्वतःचा सांभाळ करण्यासाठी सोडत नाही. जोपर्यंत आपण जाणूनबुजून त्याच्यापासून दूर जात नाही तोपर्यंत तो आपल्याला स्वतःहून दूर जाण्यास सोडत नाही. तरीसुद्धा तो केवळ एक कुजबुज दूर आहे,आपल्याला फक्त त्याला हाक द्यावी लागेल!

जेव्हा तुम्ही ईयोबाचा एकतिसावा अध्याय वाचता तेव्हा तुम्हाला ईयोबाने त्याचे जीवन जगताना घेतलेल्या निर्णयांचा संपूर्ण संच दिसतो. अध्याय वाचणे आणि त्यात देवाला नाराज करणारे काही आहे का हे पाहण्यासाठी आपल्या जीवनाकडे निक्षूून पाहणे मनोरंजक आहे. जर असेल,तर आपल्याला फक्त कबुलीजबाबाची प्रार्थना करायची आहे आणि आपल्या उणीवांबद्दल देवाजवळ पश्चात्ताप करायची आणि त्याने मुक्तपणे दिलेली क्षमा मिळवायची आहे!

नीतिसूत्राचा लेखक म्हणतो की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. काय अभिवचन आहे!

घोषणा: मी आज आणि दररोज अरुंद फाटक निवडतो.

दिवस 4दिवस 6

या योजनेविषयी

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही We Are Zion चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: instagram.com/wearezion.in