वचनबद्धतानमुना
येशूप्रत वचनबद्धता
येशूसाठी आमची वचनबद्धता आमच्या इतर सर्व वचनबद्धतेसाठी पायाभूत आधार म्हणून
कार्य करते.
आम्ही त्याला आमच्या वचनबद्धतेचे वचन देतो, आणि त्या बदल्यात, आमच्या इतर सर्व
वचनबद्धतेची पूर्तता करण्याचे सामर्थ्य तो आम्हास पुरवितो.
आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक तंतूने - हृदय, आत्मा, मन आणि सामर्थ्याने त्याच्यावर
मनापासून प्रेम करण्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आले आहे - आणि आम्हाला तसे
करण्याचे सामर्थ्य पुरविण्यात आले आहे कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रीती केली.
आपल्यावरचे त्याची प्रीती समजून घेतल्याने परस्पर प्रीती करणे सोपे होते आणि बदल्यात
त्याच्यावर प्रेम करण्यास आम्ही वचनबद्ध होतो, कारण तो स्वभावतः प्रेमळ आहे.
येशूप्रत वचनबद्ध राहण्यासाठी, आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्याला स्वेच्छेने
समर्पित करतो. आपण जाणूनबुजून आपल्या दिवसाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्याचा समावेश
करतो, त्याच्या सान्निध्याची सतत जाणीव ठेवून त्याच्या बदल्यात त्याला आमच्या स्वतःच्या
उपस्थितीची मूल्यवान भेट अर्पण करतो, ज्याची तो इच्छा बाळगतो.
वचनबद्धतेला स्तर नसतात; ते अंतःकरणपूर्वक असले पाहिजे; ते “सर्वस्व” असले पाहिजे. सत्य
हे आहे की देवाने स्वतःला पूर्णपणे आमच्यासाठी समर्पित केले आहे. तो आमच्यासाठी आहे
आणि आमच्या विरोधात नाही. त्याने आम्हाला वचन दिले आहे की तो आम्हाला कधीही
सोडणार नाही; तो येथे राहण्यासाठी आहे. तो आमची इच्छा धरतो, आणि आम्ही त्याला हवे
आहोत.
या विश्वाचा उत्पन्नकर्ता, राजांचा राजा, आपल्याशी नातेसंबंध स्थापन करू इच्छितो ही
वस्तुस्थिती अतिशय सुंदर आहे. ती अथांग आहे, अनाकलनीय देणगी आहे, तरीही कधी कधी
आपण ते गृहीत धरतो.
हे जाणून की त्याने आम्हास आधीच शोधले आहे आणि त्याच्या पूर्णत्वासह सर्व गोष्टी
औदार्याने आम्हास बहाल केल्या आहेत, आपण इतर सर्व गोष्टींपेक्षा त्याचा शोध घेण्यास
प्राधान्य द्यावे.
आपण त्याला आपले सर्वस्व देण्यासाठी, बदल्यात त्याला पूर्णपणे आपलेसे करून घेण्यास
वचनबद्ध आहोत का?
ही एक सुंदर देवाणघेवाण आहे, जी सर्वात गंभीर वचनबद्धता आपण करू शकतो, कारण
येशूप्रत वचनबद्ध झाल्याने, आम्हाला बदल्यात त्याचे सर्वस्व प्राप्त करून घेण्याची अतुल्य
आणि देणगी लाभते.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
वचनबद्धतेची शब्दकोश व्याख्या आहे “एखाद्या निमित्तासाठी, क्रियेसाठी किंवा नातेसंबंधासाठी समर्पित असण्याची स्थिती किंवा गुणवत्ता.” ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, आम्हाला वचनबद्ध जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. वचनबद्धता हे एक शक्तिशाली बळ आहे जे आपल्याला देवासोबतच्या आपल्या चालचलणुकीत चिकाटी, धैर्य आणि भरभराट करण्यास प्रवृत्त करते.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/