YouVersion लोगो
सर्च आयकॉन

वचनबद्धतानमुना

वचनबद्धता

3 पैकी 2 दिवस

विश्वासू कारभारीपणाप्रत वचनबद्धता

आपल्या स्वर्गीय पित्याने आपणास दिलेली कृपादाने, प्रतिभा आणि संसाधने तत्परतेने आणि

प्रामाणिकपणे कामी आणणे हे आपले कर्तव्य आहे.

विश्वासू कारभारीपणाप्रत आमची वचनबद्धता म्हणजे आमचा वेळ, क्षमता आणि पैसे या सर्व

गोष्टींचा उपयोग राजास आदर देण्यासाठी आणि त्याच्या राज्याची वाढ करण्यासाठी

जाणूनबुजून करणे.

पवित्रशास्त्रात कारभारीपणाच्या महत्त्वावर अनेक निर्देश आहेत, ज्यामध्ये येशू स्वतः असे

दृष्टांत देतो जे विश्वासू आणि सुज्ञ कारभारीपणाच्या महत्त्वाबद्दल सांगतात (मत्तय 25:14-

30).

राजाची मुले म्हणून, आम्हाला आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूत त्याला गौरव आणि महिमा

देण्यासाठी आमची अद्वितीय प्रतिभा आणि क्षमता याचा उपयोग करण्यासाठी पाचारण

करण्यात आले आहे.

आपण आपल्या कामात तत्परता आणि उत्कृष्टता दाखविली पाहिजे (1 पेत्र 4:10, कलस्सै

3:23, नीतिसूत्रे 3:27).

या शिवाय, आपल्याजवळ जे काही आहे ते शेवटी देवाचे आहे हे ओळखून आणि गरजूंना

उदारतेने देण्यास, आपल्या आर्थिक बाबतीत विश्वासू राहण्यासाठी आम्हाला पाचारण

करण्यात आले आहे.

विश्वासू कारभारापणाप्रत आपली वचनबद्धता भौतिक संपत्तीच्या पलीकडे आहे, ती आपल्या

कृती आणि वृत्तींमध्ये सुद्धा अपेक्षित आहे.

आम्हाला आपल्या शब्दांविषयी सावध असण्यासाठी, निंदा टाळण्यासाठी आणि शांततेची

आणि स्थिरचित्ततेची भावना बाळगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे (नीतिसूत्रे 16:28,

1 थेस्सल 4:11).

आपण जे काही करतो त्यामध्ये, आपणास ते असे केले पाहिजे जणू ते आपण प्रभूसाठी करीत

आहोत, आपल्या योग्य देवाची उपासना म्हणून आपले सर्वाेत्तम प्रयत्न अर्पण केले पाहिजेत

(कलस्सै 3:23).

विश्वासू कारभारीपणाप्रत आपल्या अटळ वचनबद्धतेद्वारे, आम्ही देवाच्या तरतुदीबद्दलचा

आमचा सखोल आदर प्रगट करतो, त्याच्या शिकवणींबद्दलचा आमचा आज्ञाधारकपणा प्रदर्शित

करतो आणि शेवटी त्याच्या नावाला गौरव देतो.

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

वचनबद्धता

वचनबद्धतेची शब्दकोश व्याख्या आहे “एखाद्या निमित्तासाठी, क्रियेसाठी किंवा नातेसंबंधासाठी समर्पित असण्याची स्थिती किंवा गुणवत्ता.” ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, आम्हाला वचनबद्ध जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. वचनबद्धता हे एक शक्तिशाली बळ आहे जे आपल्याला देवासोबतच्या आपल्या चालचलणुकीत चिकाटी, धैर्य आणि भरभराट करण्यास प्रवृत्त करते.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/