YouVersion लोगो
सर्च आयकॉन

वचनबद्धतानमुना

वचनबद्धता

3 पैकी 1 दिवस

नातेसंबंधाप्रत वचनबद्धता

देवाच्या प्रीतीवर मनन करणे

जीवनातील सर्वात महत्वाची वचनबद्धता म्हणजे आपल्या नातेसंबंधांबद्दलचे आपले अटळ

समर्पण. आपले वैवाहिक नाते असो, कुटुंबाचे मूल्यवान बंधन असो, घनिष्ठ मैत्रीचे प्रेमळ नाते

असो अथवा ख्रिस्ताच्या देहातील परस्परसंबंध असो, ही नाती जोपासण्याची आणि ती

टिकवून ठेवण्याची आपली दृढ वचनबद्धता देवाचे अमर्याद प्रेम आणि अतूट विश्वासूपणा

दर्शवते.

शास्त्रवचने आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनास प्राधान्य देण्याच्या आणि त्यांचे संगोपन

करण्याच्या महत्त्वाची आठवण घडवून देतात, निःस्वार्थ प्रीतीने आपल्या जोडीदाराचा सन्मान

आणि आदर करावा जे ख्रिस्ताच्या मंडळीप्रीत्यर्थ केलेले बलिदानात्मक प्रेम प्रतिबिंबित करते.

शिवाय, 1 तीमथ्य 5:8 आपल्या कुटुंबांच्या गरजा अटळ समर्पणाने पुरविण्याची आणि त्यांची

काळजी घेण्याची गंभीरता अधोरेखित करते.

बायबल अढळ निष्ठावान आणि सहाय्यक मित्र असण्याच्या महत्वावर जोर देते, आपण

सहानुभूती आणि करुणेने एकमेकांचे ओझे वाहून घ्यावे आणि प्रोत्साहन व उपदेशाने

एकमेकाची प्रगती करावी.

नीतिसूत्राची वचने नेहमी प्रेम करणाऱ्या मित्राबद्दल आणि संकटात मदतीसाठी जन्मलेल्या

भावाविषयी बोलतात, स्थिर मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करतात.

आम्हाला एकमेकाप्रत प्रेमाने समर्पित होण्यासाठी आणि स्वतःपेक्षा अधिक एकमेकांचा आदर

करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

आणि जेव्हा आपण एकमेकांची ओझी वाहून नेऊ तेव्हा आपण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करू.

येशूचे अनुयायी या नात्याने, आम्हाला येशू ख्रिस्ताच्या अतुल्य प्रेमाचे प्रतिबिंब असलेले

अस्सल आणि खरे नाते जोपासण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

योहान 17:20 मध्ये, येशूने त्याच्या अनुयायांच्या ऐक्यासाठी प्रार्थना केली, ज्याप्रमाणे तो

आणि पिता एक आहेत, या समजाने की आपल्या प्रेमातील एकतेमुळे, जग ख्रिस्ताच्या

संदेशावर विश्वास ठेवेल.

जर आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत, तर ख्रिस्तासाठी जग जिंकले जाऊ शकते.

आपल्या नातेसंबंधांतील प्रीती आणि ऐक्याबद्दलची आपली वचनबद्धता, येशूच्या गंभीर

प्रेमाची एक आकर्षक साक्ष म्हणून काम करते, इतरांना स्वतःसाठी त्याचे प्रेम आणि कृपा

अनुभवण्यास आकर्षित करते.

हे वचन मोठ्याने वाचून समाप्त करू या,

20 मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात

त्यांच्यासाठीही विनंती करतो, 21 ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या,

जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये ख्एक, व्हावे, कारण तू

मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.

प्रीती धारण करा, आदर बाळगा, ऐक्य जोपासा, आणि मग जग जाणेल...

दिवस 2

या योजनेविषयी

वचनबद्धता

वचनबद्धतेची शब्दकोश व्याख्या आहे “एखाद्या निमित्तासाठी, क्रियेसाठी किंवा नातेसंबंधासाठी समर्पित असण्याची स्थिती किंवा गुणवत्ता.” ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, आम्हाला वचनबद्ध जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. वचनबद्धता हे एक शक्तिशाली बळ आहे जे आपल्याला देवासोबतच्या आपल्या चालचलणुकीत चिकाटी, धैर्य आणि भरभराट करण्यास प्रवृत्त करते.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/