YouVersion लोगो
सर्च आयकॉन

महान आदेशनमुना

महान आदेश

3 पैकी 3 दिवस

जाण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे... पण मी कोठून सुरुवात करावी?

जसजसे आपण ख्रिस्तासोबतच्या आपल्या वाटचालीत खोलवर जातो तसतसे आपल्यातील

त्याच्या प्रीतीचा ओघ आपल्याला इतरांपर्यंत पोहोचण्यास प्रवृत्त करतो.

महान आदेश आम्हास सुवार्तेची साक्ष देण्यास, देवाच्या चांगुलपणाची घोषणा करण्यास आणि

येशूमध्ये आढळणाऱ्या जीवन बदलणाऱ्या सामर्थ्याची साक्ष देण्यास पाचारण करतो.

दयाळूपणाचे प्रत्येक कार्य, प्रेमात बोललेला प्रत्येक शब्द, तारणाचे गहन सत्य इतरांना

सांगण्यासाठी आमच्या महान आदेशाचा भाग बनतो.

महान आदेश प्रभावीरित्या पूर्ण करण्यासाठी, आपण प्रथम देवाने आपल्यासाठी काय केले

याची चमत्कृती स्वीकारली पाहिजे. सुवार्ता ही केवळ उत्तम बातमी नाही; जगाला माहीत

असलेली ही सर्वोत्तम बातमी आहे! ख्रिस्ताचे अनुयायी असण्याचा आनंद आपण प्रभावीपणे

सामायिक करण्यापूर्वी त्या आनंदाचा आपण स्वतः अनुभव घेतला पाहिजे. आपण त्याच्या

सत्याच्या अन् कृपेच्या प्रकाशात वाटचाल करीत असताना, आपण इतरांची अंधारातून सुटका

प्राप्त करण्यात मदत करू शकतो.

सर्वप्रथम, आम्हाला आमच्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती करण्यास पाचारण करण्यात

आले आहे. या मूलभूत तत्त्वाची संकल्पना जरी सोपी असली तरीही जगणे आव्हानात्मक असू

शकते. तथापि, जेव्हा आपण आपल्या जीवनात परमेश्वराच्या अस्तित्वाचे मोल आणि त्याद्वारे

घडून येणारा बदल समजून घेतो, तेव्हा ही देणगी इतरांसोबत सामायिक करण्याची नैसर्गिक

इच्छा बनते.

महान आदेश पूर्ण करण्यासाठी प्रार्थना हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. जेव्हा आपण

इतरांस सुवार्ता सांगण्यात सहभागी होतो, आपण बियाणे पेरतो आणि त्यांना पाणी घालतो,

परंतु शेवटी वाढ आणि बदल घडवून आणणारा देवच आहे. सुवार्ता सांगण्याच्या आपल्या

प्रयत्नांमध्ये, आपण प्रार्थनेच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे आवश्यक आहे, आपण ज्यांस

भेटतो त्यांच्या जीवनात देवाचे मार्गदर्शन आणि हस्तक्षेप मिळावा म्हणून देवाचा धावा करणे

आवश्यक आहे.

आपल्या सभोवतालच्या लोकांशी संवाद साधत असताना, प्रत्येक भेटीस ख्रिस्ताच्या प्रीतीचे

प्रतिबिंब बनविण्याची संधी बनवीत आमच्या शब्दांस व कृतींस स्वतः मूर्तिमंत प्रेमाने मार्ग

दाखवावा.

दिवस 2

या योजनेविषयी

महान आदेश

“महान आदेश” बायबल योजनेमध्ये आपले स्वागत आहे, ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्यास बाहेर जाऊन त्याचे प्रेम सर्वांना सांगण्यासाठी दिलेल्या दैवी आदेशाचे अध्ययन. हा तीन दिवसांचा प्रवास देवाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पाचारण म्हणून महान आदेशाचा स्वीकार करण्याच्या गंभीर महत्त्वाचे विवेचन करेल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/