YouVersion लोगो
सर्च आयकॉन

महान आदेशनमुना

महान आदेश

3 पैकी 2 दिवस

जाण्याची आज्ञा लाभलेले...पण मी कोठे जातो?

बरेचदा, आपण महान आदेशाची पूर्तता करण्याचा एक उदात्त प्रयत्न म्हणून कल्पना करतो

ज्यासाठी दूरच्या प्रदेशात जाणे आवश्यक ठरते. हे काही लोकांबाबत खरे असेल, पण

आपल्यापैकी अनेकांसाठी, मिशन क्षेत्र आम्ही आधीच राहत असलेल्या जागेत आहे.

देवाच्या राज्याची घोषणा करण्याचे पाचारण आपण ज्यास शेजारचे घर म्हणतो त्या

परिसरातून प्रतिध्वनित होते, आपण ज्या दैनंदिन संभाषणांमध्ये गुंततो आणि दररोज

वैयक्तिक पातळीवर आपण ज्या जीवनाला स्पर्श करतो त्यातून.

संपूर्ण जग हे आमचे मिशन क्षेत्र आहे, पण त्याचा शोध घेण्यासाठी आम्हास कठीण प्रवासावर

निघण्याची गरज नाही.

ही जागा अगदी तीच असू शकते जेथे आम्ही सध्या आहोत.

या सत्याचा स्वीकार करा की प्रत्येक साधारण क्षणात राज्याच्या प्रभावासाठी असाधारण

क्षमता आहे.

मिशन क्षेत्र आमच्या पुढच्या दारापलीकडेच, परिचित चेहेर्यंामध्ये ज्यांची आम्ही रोज भेट

घेतो, आमची वाट पाहत आहे.

पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, प्रेमाने ओतप्रोत होऊन, आम्ही राहत असलेल्या जागी

येशूविषयी सांगण्यासाठी विश्वासाने बाहेर पाऊल टाका.

2 करिंथ 5:20

“म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने (राजदूत म्हणून)

वकिली करतो.”

ख्रिस्ताची प्रीती आणि सत्य प्रत्येकास, प्रत्येक राष्ट्रात आणि प्रत्येक घरात सामायिक करण्याचे

कार्य आम्हास सोपविण्यात आले आहे. आपण या महान आदेशास उत्कटतेने आणि हेतूपूर्वक

उत्तर देऊ या. आपण महान आदेश पूर्ण करत असताना, प्रेमाने, आपण जगाला तारण

देण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी देवाच्या चिरंतन योजनेत सहभागी होतो.

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

महान आदेश

“महान आदेश” बायबल योजनेमध्ये आपले स्वागत आहे, ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्यास बाहेर जाऊन त्याचे प्रेम सर्वांना सांगण्यासाठी दिलेल्या दैवी आदेशाचे अध्ययन. हा तीन दिवसांचा प्रवास देवाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पाचारण म्हणून महान आदेशाचा स्वीकार करण्याच्या गंभीर महत्त्वाचे विवेचन करेल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/