महान आदेशनमुना
जाण्याची आज्ञा मिळालेले - सर्वांकरिता सर्वांप्रत
“सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.” - मार्क 16:15
महान आदेशाच्या खोलात, आम्हास एक गहन सत्य आढळते - ती आम्हास फक्त देण्यात
आलेली आज्ञा नाही तर स्वतः देवाच्या अस्तित्वाच्या तंतूमध्ये गुंफलेले एक शाश्वत मिशन
आहे.
महान आदेश, त्याच्या मुळाशी, देवाच्या अंतःकरणाची अभिव्यक्ती आहे.
पित्याने मिशनची सुरूवात केली, त्याच्या पुत्रास पाठविले, आणि बदल्यात, पिता आणि
पुत्राने पवित्र आत्म्यास पाठविले. आता आम्हाला मुक्ति आणि प्रीतीच्या ह्या दैवी गाथेत
सहभागी होण्याची आज्ञा देण्यात आली आहे, आणि तो आम्हास पाठवितो.
आपण असे कुठलेही गैरसमज दूर करू या जे महान आदेशास काही निवडक लोकांपुरते किंवा
काही ठराविक ऋतूंपुरते मर्यादित करतात. हा आदेश त्या सर्वांसाठी आहे जे स्वतःला
ख्रिस्ताचे शिष्य - देवाची मुले म्हणवतात.
आपली पार्श्वभूमी, योग्यता किंवा मर्यादा काहीही असो, पृथ्वीवरील देवाचे राज्य पुढे नेण्यात
आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
कोणतेही राष्ट्र किंवा प्रदेश या महान आदेशाच्या आवाक्याबाहेर नाही. आम्ही प्रत्येक दुखत्या
अंतःकरणासाठी उपायाने, प्रत्येक इच्छा धरणाऱ्या आत्म्यासाठी उत्तराने सुसज्ज होऊन
येशूच्या बदल घडवून आणणाऱ्या प्रेमाची साक्ष देतो.
कळवळा आणि खात्रीसह, आम्ही येशूमध्ये आढळणारी आशा घोषित करतो, कोणत्याही
राष्ट्राला आम्ही न बदलेले सोडत नाही, कोणतेही अंतःकरण स्पर्श केल्यावाचून राहत नाही.
लक्षात ठेवा, महान आदेश ही केवळ एक सूचविलेली गोष्ट नसून एक दैवी आदेश आहे. जग
प्रकाशासाठी, त्याच्या उपचारात्मक स्पर्शासाठी आणि अमोघ प्रेमासाठी तळमळत आहे; आपण
त्यांची येशूशी ओळख करून दिली पाहिजे. आपली दृष्टी सीमांच्या पलीकडे पसरली पाहिजे,
प्रत्येक राष्ट्रास, प्रत्येक लोकसमूहास आणि सत्याची भूक बाळगणाऱ्या प्रत्येक आत्म्याला
व्यापून टाकले पाहिजे.
आपण उद्देशाने उठू या, आपल्या मिशनमध्ये दृढनिश्चय करूया आणि आपणास सोपविलेले
पाचारण पूर्ण करूया.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
“महान आदेश” बायबल योजनेमध्ये आपले स्वागत आहे, ख्रिस्ताच्या प्रत्येक शिष्यास बाहेर जाऊन त्याचे प्रेम सर्वांना सांगण्यासाठी दिलेल्या दैवी आदेशाचे अध्ययन. हा तीन दिवसांचा प्रवास देवाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पाचारण म्हणून महान आदेशाचा स्वीकार करण्याच्या गंभीर महत्त्वाचे विवेचन करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/