YouVersion लोगो
सर्च आयकॉन

किंमतनमुना

किंमत

3 पैकी 3 दिवस

अंतिम किंमत

आपण अविश्वसनीय बलिदानावर मनन करू या जे देवाने आमच्यासाठी आपला प्राण देऊन केले.

यात गुंतलेली किंमत गंभीर आहे आणि त्यासाठी आपल्या मनापासून समर्पण करण्याची गरज आहे.

आम्ही सर्वस्वी त्यात आहोत किंवा त्यात अजिबात नाही:

आमच्या विश्वासाच्या प्रवासात, आम्हाला एक पर्याय दिला जातो. ही एक सर्वस्व-किंवा-काही नाही वचनबद्धता

आहे. आपल्याला पूर्णतः सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, आपले पूर्ण स्वत्व देवाला अर्पण

करण्यासाठी. अपूर्ण अंतःकरणाने केलेल्या भक्तीमध्ये आवश्यक असलेल्या खऱ्या समर्पणाचा अभाव आहे.

देवासोबत सखोल आणि सलगीचे नाते प्राप्त करण्यासाठी, आम्हाला आपल्या सर्वस्वाचे समर्पण करण्याचा आग्रह

करण्यात आला आहे.

याचा अर्थ जे देवाचे नाही ते सर्वकाही सोडून देणे आहे. समर्पणाची ही कृती आमच्या जीवनांत त्याच्या उपस्थितीची

परिपूर्णता अनुभव करण्याची किल्ली आहे.

मत्तय 13:44 एक सामर्थ्यशाली दृष्टांत सांगतो जी त्यात समाविष्ट किंमत स्पष्ट करतो. स्वर्गाच्या राज्याची तुलना

शेतात लपलेल्या खजिन्याशी करण्यात आली आहे. एक माणूस हा खजिना शोधतो आणि आनंदाने भारावून जातो, ते

शेत खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे असलेले सर्व काही विकतो. खजिना मिळवण्यासाठी हा व्यक्ती स्वेच्छेने आपल्या

सर्वस्वाचा त्याग करतो.

हा दृष्टांत आपल्या विश्वासासाठी आपले सर्वस्व देण्याच्या महत्त्वावर जोर देतो. दृष्टांतातील मनुष्याने आपल्या

मालकीचे सर्व काही विकले; त्याचप्रमाणे आमचे सर्वस्व देवाला अर्पण करण्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आले

आहे.

ही फार मोठी किंमत आहे असे कदाचित वाटेल, परंतु त्या बदल्यात आपल्याला मिळणारा आनंद आणि परिपूर्णता

अपरिमीत आहे.

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण ज्या प्रत्येक गोष्टीस किंमत म्हणून मोजतो, जी प्रत्येक गोष्ट आपण तोटा

म्हणून समजतो - ते सर्व काही - आपल्या जीवनात येशू असण्याच्या असीमित लाभाच्या तुलनेत काहीही नाही.

आज, आपण देवाने आपल्यासाठी दिलेल्या अंतिम किंमतीवर विचार करूया आणि स्वतःस आपले सर्वस्व देण्याची

प्रेरणा देऊ या. आपल्या जीवनात त्याची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी आपण आपले सर्व समर्पण करू या.

किंमत फार मोठी वाटू शकते, परंतु येशू आमच्यासोबत असण्याचा अतुल्य लाभ आपण ज्यास बलिदान समजू शकतो

त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.

पवित्र शास्त्र

दिवस 2

या योजनेविषयी

किंमत

या बायबल योजनेत आपले स्वागत आहे ज्यात भारतातील सुवार्ता न पोहोचलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आम्ही भारतातील प्रमुख गरजा समजून घेऊन मंच तयार करू, नंतर आम्ही त्या पायर्यांचा शोध घेऊ ज्याच्यासोबत एक किंमत आहे आणि शेवटी आपण अंतिम किंमत - देवाने आपल्यासाठी आपला प्राण देऊन केलेल्या बलिदानाविषयी बोलू.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/