YouVersion लोगो
सर्च आयकॉन

किंमतनमुना

किंमत

3 पैकी 2 दिवस

किंमत जी तुम्ही चुकविली पाहिजे

संसाधनांचे पुनर्निर्देशन आणि आऊटरीच

बायबल योजनेच्या 2 र्या दिवसात तुमचे स्वागत आहे. आज, आपण तीन महत्वाच्या चरणांचे विवेचन करू या

ज्यांच्यासाठी किंमत चुकवावी लागते: संसाधनांचे पुनर्निर्देशन करणे, आपल्या सेवाकार्याचे पुनर्मूल्यांकन करणे, आणि

आमची जीवनशैली पुनः डिझाईन करणे.

योग्य वचन आणि चिंतनासोबत या चरणांचा शोध घेऊ या.

चरण 1: संसाधनांचे पुनर्निर्देशन करणे

प्रेषितांची कृत्ये 1:8 “परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व

यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”

ख्रिस्ती आउटरीच आणि सुवार्ताकार्यातील संसाधनांच्या सांप्रत वाटपावर विचार करा. दुर्दैवाने, आकडेवारीवरून असे

दिसून येते की या प्रयत्नांपैकी महत्वपूर्ण टक्केवारी (91टक्के) प्रामुख्याने ख्रिस्ती नसलेल्यांऐवजी ख्रिस्ती लोकांनाच लक्ष्य

करते. ज्यांनी अद्याप सुवार्ता ऐकली नाही त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी संसाधने पुनर्निर्देशित करण्याच्या

प्रभावाचा विचार करा.

याव्यतिरिक्त, मिशनरींच्या वितरणाचा विचार करा, जेथे मोठ्या प्रमाणात (76टक्के) मिशनरी सुवार्ता पोहोचलेल्या

जगात सेवा करतात, तर केवळ एक लहान टक्केवारी (1टक्के) ज्यांनी कधीही सुवार्ता ऐकली नाही त्यांच्यावर केंद्रित

आहे. अगम्य आणि अप्रचारित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राधान्यक्रम बदलण्यासाठी प्रार्थना करा.

चरण 2: आपल्या सेवाकार्याचे पुनर्मूल्यांकन करणे

मार्क 11:12-14 वाचा, यात येशू निष्फळ अंजिराच्या झाडाला शाप देतो.

आमच्या सेवाकार्याच्या पद्धतींचे मूल्यमापन करण्याच्या महत्त्वावर चिंतन करा.

आमचे ध्येय “सुवार्ता दारिद्रîाचा” नायनाट करणे आणि ही खात्री करणे असले पाहिजे की सुवार्तेचा प्रभावीपणे

प्रसार करण्यासाठी आमचे प्रयत्न संरेखित आहेत का. आमच्या धोरणांचे, कार्यपद्धतींचे आणि दृष्टिकोनांचे पुनर्मूल्यांकन

करण्यासाठी बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करा, यासाठी की आम्ही देवाच्या राज्यासाठी फळ आणावे.

चरण 3: आमची जीवनशैली पुनः डिझाईन करणे.

मत्तय 6:25 वाचा, जेथे येशू आपल्या गरजांबद्दल चिंता न करण्याविषयी शिकवतो.

2 करिंथ 11:27 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रेषित पौलाच्या जीवनशैलीचा विचार करा. पौलाने सेवाकार्यात स्वतःला

संपूर्ण अंतःकरणाने समर्पित केले आणि अनेकदा झोप, अन्न, विश्रांती आणि सुरक्षिततेचा त्याग केला. सीटी स्टडच्या

गोष्टीवर चिंतन करा, ज्यांनी सुवार्ता प्रचार करण्याचे, स्वतःच्या विश्रांतीचा त्याग करण्याचे आणि चिरस्थायी प्रभाव

टाकण्याचे उदाहरण प्रस्तुत केले.

तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीचे आणि सुवार्ताप्रचाराच्या मिशनशी ते कसे जुळते याचे मूल्यांकन करा. देवाच्या

राज्याच्या प्रगतीला प्राधान्य देताना तरतुदीसाठी देवावर विश्वास ठेवून त्यागाची मानसिकता बाळगण्यासाठी

प्रार्थना करा.

उपसंहार:

आज, आपण संसाधनांचे पुनर्निर्देशन करणे, आपल्या सेवाकार्याचे पुनर्मूल्यांकन करणे, आणि आमची जीवनशैली पुनः

डिझाईन करण्याच्या चरणांचे विवेचन केले आहे.

प्रार्थना करण्यासाठी वेळ काढा आणि या चरणांवर विचार करा, त्यांना तुमच्या जीवनात लागू करण्यासाठी देवाचे

मार्गदर्शन प्राप्त करा. भारतातील आणि त्यापलीकडेही सुवार्ता न पोहोचलेल्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचण्यासाठी

देव आम्हांला सामर्थ्य देवो.

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

किंमत

या बायबल योजनेत आपले स्वागत आहे ज्यात भारतातील सुवार्ता न पोहोचलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आम्ही भारतातील प्रमुख गरजा समजून घेऊन मंच तयार करू, नंतर आम्ही त्या पायर्यांचा शोध घेऊ ज्याच्यासोबत एक किंमत आहे आणि शेवटी आपण अंतिम किंमत - देवाने आपल्यासाठी आपला प्राण देऊन केलेल्या बलिदानाविषयी बोलू.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/