किंमतनमुना
भारतातील गरजा समजून घेणे
बायबल योजनेच्या पहिल्या दिवशी आपले स्वागत आहे. किंमत मोजण्याबद्दल बोलण्यापूर्वी, भारतातील प्रमुख
गरजांस संबोधित करण्यावर लक्ष केंद्रित करूया.
या गरजा अधोरेखित करणाऱ्या आणि बदलाची निकड लक्षात घेणाऱ्या आकडेवारीचा शोध घेऊ या.
मुख्य आकडेवारी:
1. भारतातील 90 टक्के खेड्यांमध्ये चर्चेस नाहीत: ग्रामीण क्षेत्रात ख्रिस्ती उपस्थितीची महत्वपूर्ण कमतरता आणि
सुवार्तेच्या प्रसारावर होणाऱ्या परिणामावर विचार करा.
2. भारतातील 2,279 लोकसमुहांनी सुवार्ता ऐकलेली नाही: जोशुआ प्रकल्पानुसार, भारतात मोठ्या संख्येत लोकांनी
सुवार्ता ऐकलेली नाही आणि त्यांना तारणाचा संदेश ऐकण्याची संधी मिळालेली नाही. ही एक विचारणीय बाब आहे
की जेथे सुवार्ता पोहोचलेली नाही अशा जगात दररोज अंदाजे 70,000 लोक मरतात हे समजावे.
3. मर्यादित बायबल भाषांतर: भारतात 1,600 मातृभाषा आणि 700 बोलीभाषा असलेली अफाट भाषिक
विविधता असूनही, केवळ 52 भाषांमध्ये संपूर्ण बायबल भाषांतर झाले आहे. लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत
पवित्र शास्त्र प्रभावीपणे सामायिक करण्याकरता हे काय आव्हान करते यावर चिंतन करावे.
4. जगातील एक तृतीयांश सुवार्ता न पोहोचलेले लोकसमूह भारतात आहेत: भारतातील सुवार्ता न पोहोचलेल्या
लोकसमूहांच्या अफाट संख्येवर आणि त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचवण्याचे महत्त्व यांचा विचार करा.
5. येशूचे दुसरे आगमन - मत्तय 24:14 मध्ये दिलेल्या वचनावर मनन करा, जे ख्रिस्ताच्या पुनरागमनाची पूर्व अट
म्हणून सुवार्तेच्या जागतिक घोषणेस अधोरेखित करते. ही भविष्यवाणी पूर्ण करण्यात आपण कोणती भूमिका
बजावतो हे आणि जेथे सुवार्ता पोहोचलेली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची निकड लक्षात घ्या.
बदल आणि किंमत:
जगापर्यंत सुवार्ता घेऊन जाण्यासाठी एक किंमत मोजावी लागते; आणि बदल ही किंमत आहे जिचा आपण स्वीकार
केला पाहिजे.
या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी बदल आवश्यक आहे.
यासाठी प्राधान्यक्रम, संसाधने आणि वैयक्तिक वचनबद्धतेमध्ये बदल आवश्यक आहे.
येशूचे अनुयायी म्हणून, आम्हाला बदलाचे एजंट होण्यासाठी आणि महान आज्ञा पूर्ण करण्यात सक्रियपणे सहभागी
होण्यासाठी पाचारण करण्यात आले जाते.
त्यामध्ये संसाधने पुनर्निर्देशित करणे, सेवेच्या दृष्टिकोनाचे पुनर्मूल्यांकन करणे, आपल्या जीवनशैलीची पुनर्रचना करणे
आणि सुवार्ता सांगण्यासाठी स्वतःला बहाल करणे यांचा समावेश असू शकतो.
बदल घडवून आणण्यात आणि भारतातील ज्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचलेली नाही त्यांच्याप्रत ती पोहोचण्याच्या
आमच्या भूमिकेविषयी चिंतन करा.
क्षणभर थांबून प्रार्थना करा आणि देवाला विनंती करा की त्याने या गरजा समजण्यात आमची मदत करावी आणि
योग्य कार्रवाई करण्यात आमचे मार्गदर्शन करावे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
या बायबल योजनेत आपले स्वागत आहे ज्यात भारतातील सुवार्ता न पोहोचलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आम्ही भारतातील प्रमुख गरजा समजून घेऊन मंच तयार करू, नंतर आम्ही त्या पायर्यांचा शोध घेऊ ज्याच्यासोबत एक किंमत आहे आणि शेवटी आपण अंतिम किंमत - देवाने आपल्यासाठी आपला प्राण देऊन केलेल्या बलिदानाविषयी बोलू.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/