YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 2 दिवस

यावेळी मेरी आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होती, त्यावेळी ती आणि तिचा जोडीदार, जोसेफ, दोघांना केसर ऑगस्टसने जनगणनेचा हुकुम घडल्यानंतर बेथलेहेमला जावे लागले. ते येथे आले, आणि मेरीला प्रसववेदना चालू झाल्या. त्यांना राहण्यासाठी कोणताही निवास मिळाला नव्हता, त्यांना प्राणी राहतात टी जागा मिळाली होती. मेरीने मुलाला जन्म दिला आणि आणि त्या प्राण्यांच्या कळपामध्ये भविष्यातील राजाला येथे आणले. 


मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चारत होते आणि त्यावेळी अचानकपणे एक तेजस्वी देवदूत त्यांच्यासमोर आला. अर्थात, ते पूर्णतः आश्चर्यचकित झाले पण त्या देवदूताने सांगितले की आपण आता जल्लोष करा कारण आपल्याला वाचवणारा आता जन्माला आलेला आहे. त्यांना सांगण्यात आले त्यांना एक बाळ कापडात गुंडाळलेली मिळेल आणि त्यांच्या कळपात आराम करत असेल.. देवदूतांना एक मोठा समूह देवाने पाठविलेल्या शांतीदुताच्या जन्माच्या सोहळ्यासाठी हजर झाला. त्या मेंढपाळांनी कोणताही क्षण न दवडता बाळाचा शोध घ्यायला सुरुवात केली. देवदुताने सांगितल्याप्रमाणे त्यांनी नवजात येशुंना प्राण्यांच्या निवासात पाहिले. आणि ते आश्चर्यचकित झाले. ते त्यांचा अनुभव सांगताना थांबत नव्हते, आणि ज्या लोकांना त्यांनी जाऊन सांगितले त्या लोकांना ही गोष्ट रहस्यमय वाटली. 


कारण देवाचे आगमन होईल असे कोणालाही अपेक्षित वाटले नव्हते.–– असे बालक जे एका कुमारी मुलीच्या पोटी मेंढ्यांच्या कळपामध्ये जन्म घेऊन, त्याचा वाढदिवस मेंढपाळ करतील असे त्यांना वाटले नव्हते. लूकच्या कथेमध्ये सर्व काही मागील काळात घडते, आणि हा एक मुद्दा आहे. त्याने सांगितले आहे की देवाचे साम्राज्य एका घाणेरड्या जागेमध्ये अवतीर्ण झाले आहे–– आणि विधवा व गरीब लोकांना याची प्रतीक्षा होती–– कारण येशूला आपल्या जगामध्ये उलथापालथ घडवून गरिबांचा प्रश्न सोडवायचा होता. 


पवित्र शास्त्र

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com