रोमकरांस पत्र 3:9-24
रोमकरांस पत्र 3:9-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग काय? आम्ही यहूदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे; शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” “त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत; त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत; त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहे; त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे; हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.
रोमकरांस पत्र 3:9-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे; त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत. विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे. कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते. पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे. पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
रोमकरांस पत्र 3:9-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही आधी यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे. असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही; समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.” “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.” “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.” “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात, दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात, आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.” “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.” आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल. नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते. पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे. परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
रोमकरांस पत्र 3:9-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग काय? आम्ही यहूदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे; शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही; समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही.” “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे; त्यांच्या ओठांच्या आत जोगी सर्पाचे विष आहे.” “त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत; त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत; त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहे; त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे; हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.
रोमकरांस पत्र 3:9-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग काय? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहुदी व यहुदीतर हे सर्व पापाच्या प्रभावाखाली आले आहेत, हे मी अगोदरच दाखवून दिले आहे. धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही. सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत, त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात. त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कटुतेने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झाले आहेत. विध्वंस व विपत्ती हा त्यांचा मार्ग आहे. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखून घेतला नाही. देवाचे भय त्यांना ठाऊक नाही. आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. मात्र आता पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करण्याची देवाची पद्धत नियमशास्त्राविना अमलात आणली जात आहे आणि तिला नियमशास्त्राचा व संदेष्ट्यांचा दुजोरा आहे. ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत.