YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 3:9-24

रोमकरांना 3:9-24 MACLBSI

तर मग काय? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहुदी व यहुदीतर हे सर्व पापाच्या प्रभावाखाली आले आहेत, हे मी अगोदरच दाखवून दिले आहे. धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही. सुज्ञ कोणी नाही, देवाचा शोध झटून घेणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते सारे चुकले आहेत, सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत, त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात. त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे. त्यांचे तोंड शापाने व कटुतेने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झाले आहेत. विध्वंस व विपत्ती हा त्यांचा मार्ग आहे. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखून घेतला नाही. देवाचे भय त्यांना ठाऊक नाही. आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते. नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. मात्र आता पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करण्याची देवाची पद्धत नियमशास्त्राविना अमलात आणली जात आहे आणि तिला नियमशास्त्राचा व संदेष्ट्यांचा दुजोरा आहे. ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत.