YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 8:15-26

गणना 8:15-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पण केल्यानंतर त्यांनी सेवा करायला दर्शनमंडपात जावे. कारण इस्राएल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत; उदरातून प्रथम निघणार्‍या अर्थात इस्राएल लोकांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे. कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले. इस्राएल लोकांतील प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. दर्शनमंडपात इस्राएल लोकांसाठी सेवा करायला व इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करायला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्राएल लोकांतून लेवी दान म्हणून मी दिले आहेत; म्हणजे इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये.” मोशे, अहरोन आणि इस्राएल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी ह्या प्रकारे लेव्यांना केले; परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी त्यांचे सर्वकाही केले. लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त केले. त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात गेले. लेव्यां-संबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “लेव्यांसंबंधीचा नियम हा : वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शनमंडपासंबंधाचा सेवाधर्म आचरावा; ते पन्नास वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये; पण त्यांनी आपल्या भाऊबंदांसह दर्शनमंडपात रक्षकाचे काम करावे, दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपवलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे.”

सामायिक करा
गणना 8 वाचा

गणना 8:15-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी. हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे. इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले. मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे. अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी. तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले. लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले. त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले. पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा. त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.

सामायिक करा
गणना 8 वाचा

गणना 8:15-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तू लेवींना शुद्ध करून हेलावणीचे अर्पण म्हणून मला सादर केल्यानंतर, त्यांनी आपले काम करण्याकरिता सभामंडपात यावे. इस्राएली लोकांमधून ते सर्वस्वी मला समर्पित आहेत. प्रत्येक इस्राएली स्त्रीच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषाऐवजी, मी त्यांना आपलेसे करून घेतले आहे. इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे. आणि मी इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे. मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही. मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएली समुदायांनी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याच प्रकारे लेव्यांना केले. लेवी लोकांनी स्वतःला शुद्ध केले आणि आपली वस्त्रे धुतली. मग अहरोनाने त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर सादर केले व त्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्त केले. नंतर लेवी लोक अहरोन व त्याच्या पुत्रांच्या देखरेखीखाली सेवा करण्यासाठी सभामंडपात आले. लेव्यांच्या संबंधी याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे त्यांनी केले. याहवेह मोशेला म्हणाले, “लेव्यांच्या संबंधी हा नियम लागू असावा: पंचवीस वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुषांनी सभामंडपामध्ये कार्यरत होण्यासाठी यावे. पन्नासाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या रोजच्या सेवेतून निवृत्त व्हावे व त्यानंतर काम करू नये. त्यांनी सभामंडपात आपल्या बांधवांना त्यांच्या कार्यात मदत करावी; परंतु त्यांनी स्वतः काम करू नये. याप्रकारे तू लेवी लोकांची कामे नेमून द्यावी.”