YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गण. 8:15-26

गण. 8:15-26 IRVMAR

तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी. हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे. इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले. मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे. अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी. तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले. लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले. त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले. पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा. त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.

गण. 8 वाचा

ऐका गण. 8