YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 12:1-12

मार्क 12:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसर्‍या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले; त्याचे तर दगडांनी डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठवले; त्याला तर त्यांनी जिवे मारले; आणि दुसर्‍या अनेकांना तसेच केले; म्हणजे त्यांच्यातील कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. ‘आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील’ असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की, ‘जो दगड बांधकाम करणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे’?” तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, “एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षरसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला. हंगामाच्या योग्यवेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठवले. परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठवले. त्यांनी त्याचे डोके फोडले आणि त्यास अपमानकारक रीतीने वागविले. मग धन्याने आणखी एका नोकराला पाठवले. त्यांनी त्यास जिवे मारले. त्याने इतर अनेकांना पाठवले. शेतकऱ्यांनी काहींना मारहाण केली तर काहींना ठार मारले. धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. तो म्हणाला, खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील. तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्यास त्या शेतकऱ्यांकडे पाठवले. परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, हा तर वारीस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल! मग त्यांनी त्यास धरले, जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येईल आणि शेतकऱ्यांना जिवे मारील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेख वाचला नाही काय? जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे.” मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यास अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. मग ते त्यास सोडून निघून गेले.

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन तो दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला. परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले. त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले. “आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो त्याचा पुत्र राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ “पण शेतकर्‍यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. “द्राक्षमळ्याचा धनी काय करेल असे तुम्हाला वाटते? तो येईल आणि त्या भाडेकर्‍यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’” प्रमुख याजक, नियमशास्त्र शिक्षक आणि वडील येशूंना अटक करण्याचा मार्ग शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती; मग ते त्यांना सोडून निघून गेले.

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसर्‍या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले; त्याचे तर दगडांनी डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठवले; त्याला तर त्यांनी जिवे मारले; आणि दुसर्‍या अनेकांना तसेच केले; म्हणजे त्यांच्यातील कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. ‘आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील’ असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की, ‘जो दगड बांधकाम करणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला; हे परमेश्वराकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे’?” तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.

सामायिक करा
मार्क 12 वाचा

मार्क 12:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला, “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. द्राक्षारसासाठी कुंड खणले. पहाऱ्यासाठी माळा बांधला आणि द्राक्षमळा कुळांकडे सोपवून तो परदेशात निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला कुळांकडून द्राक्षमळ्याच्या फळांतून आपला वाटा मिळावा म्हणून त्याने एका नोकराला कुळांकडे पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकाम्या हातांनी परत पाठवले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्याच्या डोक्यावर इजा करून त्याचा अपमान केला. त्याने आणखी एकाला पाठवले. त्याला तर त्यांनी ठार मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यांतून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांना ठार मारले. अजून त्याच्याजवळ एक जण उरला होता. तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाचा तरी ते मान राखतील, म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ती कुळे आपसात म्हणाली, ‘हा तर वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ त्यांनी त्याला धरून ठार मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येऊन त्या कुळांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही नक्वीच हा धर्मशास्त्रलेख वाचला असेल, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला.’ हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक कृत्य आहे !” तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला, हे त्यांच्या ध्यानात आले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली म्हणून ते येशूला सोडून निघून गेले.

सामायिक करा
मार्क 12 वाचा