येशू दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला, “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. द्राक्षारसासाठी कुंड खणले. पहाऱ्यासाठी माळा बांधला आणि द्राक्षमळा कुळांकडे सोपवून तो परदेशात निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला कुळांकडून द्राक्षमळ्याच्या फळांतून आपला वाटा मिळावा म्हणून त्याने एका नोकराला कुळांकडे पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकाम्या हातांनी परत पाठवले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले. त्यांनी त्याच्या डोक्यावर इजा करून त्याचा अपमान केला. त्याने आणखी एकाला पाठवले. त्याला तर त्यांनी ठार मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यांतून कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांना ठार मारले. अजून त्याच्याजवळ एक जण उरला होता. तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. आपल्या मुलाचा तरी ते मान राखतील, म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ती कुळे आपसात म्हणाली, ‘हा तर वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’ त्यांनी त्याला धरून ठार मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील? तो येऊन त्या कुळांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही नक्वीच हा धर्मशास्त्रलेख वाचला असेल, ‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला.’ हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे !” तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला, हे त्यांच्या ध्यानात आले. परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली म्हणून ते येशूला सोडून निघून गेले.
मार्क 12 वाचा
ऐका मार्क 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 12:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ