मग येशू त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागले: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली, द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन तो दुसर्या ठिकाणी राहवयास गेला. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्यांकडे पाठविला. परंतु त्यांनी त्या सेवकाला धरले, मार दिला आणि रिकाम्या हाताने माघारी पाठविले. त्याने दुसरा सेवक त्याच्याकडे पाठविला; पण त्यांनी त्या माणसाच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याला अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर त्याने आणखी एकाला पाठविले, त्याला तर त्यांनी ठारच केले आणि त्यानंतर अनेकांना पाठविले, त्यातील काहींना त्यांनी चोप दिला व इतरांना जिवे मारले. “आता त्याच्याजवळ पाठविण्यासाठी केवळ ज्याच्यावर त्याची प्रीती होती तो त्याचा पुत्र राहिला होता. त्याने त्याला सर्वात शेवटी पाठविले, व तो म्हणाला की, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ “पण शेतकर्यांनी मालकाच्या पुत्राला येतांना पाहिले, तेव्हा ते म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार करू या, म्हणजे हे वतन आपलेच होईल.’ त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले. “द्राक्षमळ्याचा धनी काय करेल असे तुम्हाला वाटते? तो येईल आणि त्या भाडेकर्यांना मारून टाकेल आणि द्राक्षमळा दुसर्यांना देईल. धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’” प्रमुख याजक, नियमशास्त्र शिक्षक आणि वडील येशूंना अटक करण्याचा मार्ग शोधू लागले, कारण तो दाखला त्यांच्याविरुद्ध सांगितला होता हे त्यांनी ओळखले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती; मग ते त्यांना सोडून निघून गेले.
मार्क 12 वाचा
ऐका मार्क 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 12:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ