YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 85

85
स्तोत्र 85
संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
1हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे;
याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.
2तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली
आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला
3म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे,
तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.
4हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा.
आमच्याविरुद्ध तुमचा क्रोध पुन्हा भडकू देऊ नका.
5तुम्ही आमच्यावर सतत कोपलेले राहणार आहात काय?
पिढ्यान् पिढ्यांवर तुमचा राग टिकून राहणार आहे काय?
6तुमचे लोक तुमच्या ठायी हर्षित व्हावे,
म्हणून तुम्ही आम्हाला पुनरुज्जीवित करणार नाही काय?
7हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा
आणि तुमचे तारण आम्हाला प्रदान करा.
8परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार;
कारण त्यांनी आपल्या लोकांना व आपल्या भक्तांना शांतीचे अभिवचन दिले आहे.
परंतु आपल्या लोकांनी मूर्खपणा करण्याचे थांबवावे.
9याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात;
मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.
10प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत;
नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
11पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे,
आणि स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे.
12याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत,
आणि आमची भूमी मुबलक पीक देणार आहे.
13नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल
आणि प्रभूच्या पावलांसाठी मार्ग सिद्ध करेल.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 85: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन