YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 84

84
स्तोत्र 84
संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ#84:0 शीर्षक: बहुतेक संगीत संबंधित एक शब्द वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.
1हे सर्वशक्तिमान याहवेह,
तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!
2याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी,
मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे;
माझा जीव व माझा देह
जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.
3हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा,
तुमच्या वेद्यांजवळ
चिमणीला घरटी बांधण्याचे,
व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे
ठिकाण सापडले आहे.
4जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत;
ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला
5ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत,
ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.
6ते बाका दरीतून#84:6 बाका दरी अर्थात् रडण्याची दरी जात असताना,
ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल;
शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.
7सीयोनात परमेश्वराच्या समोर प्रत्येकजण उपस्थित होईपर्यंत,
त्यांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढेल.
8याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;
याकोबाच्या परमेश्वरा, माझे ऐका. सेला
9हे परमेश्वरा, तुम्ही आमच्या ढालीवर दृष्टी टाका;
आपल्या अभिषिक्तावर कृपादृष्टी करा.
10तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस,
इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे;
दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा,
माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.
11कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत;
ते आम्हाला कृपा व गौरव देतात;
जे निष्कलंक असतात,
त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.
12सर्वशक्तिमान याहवेह, जे लोक तुमच्यावर भाव ठेवतात,
ते कितीतरी धन्य होत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 84: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन