YouVersion Logo
Search Icon

प्रेरितों के काम 3

3
लंगड्या भिकाऱ्याले बरं करणे
1पतरस अन् योहान दुपारच्या वाक्ती तीन वाजता प्रार्थना करायला देवळात जाऊ रायले होते. 2अन् लोकं जन्माच्या लंगड्याले आणू रायले होते, ज्याले ते दररोज या देवळाच्या दरवाज्यावर जो सुंदर म्हणल्या जातो, बसवून देत जात, कि त्यानं देवळात जाणाऱ्या येणाऱ्याले भिक मांगाव. 3जवा त्यानं पतरस अन् योहानाले देवळात जातांना पायलं, तवा त्यानं त्यायले भिक मांगतली. 4पतरस अन् योहानान सरळ त्याच्याइकडे ध्यान करून पायलं, अन् म्हतलं “आमच्या इकडे पाह्य.” 5तवा तो काई भेटायच्या आशेने त्यायच्या इकडे पाऊ लागला. 6तवा पतरसन म्हतलं, “चांदी अन् सोना तर माह्याल्या पासी नाई हाय; पण जे माह्याल्या पासी हाय, ते तुले देतो; नासरत नगरच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.” 7तवा पतरसन त्याच्या उजवा हात पकडून त्याले उठवलं; अन् तवा लवकरच त्याच्या पायात अन् घुटण्यात शक्ती आली. 8अन् तो कुदला अन् उभा झाला, अन् चालू फिरू लागला, अन् चालता कुदत देवाची स्तुती करत त्यायच्या संग देवळात गेला. 9तवा सगळ्या लोकायन त्याले चालत फिरत पायलं अन् देवाची स्तुती करत पायले. 10त्याले ओयखलं कि तो हाचं लंगडा भिखारी होता जो देवळाच्या “सुंदर” नावाच्या फाटकापासी बसून भिक मांगत होता, अन् ते घटना जे त्याच्यावाल्या संग झाली होती, ते पावून लय आश्चर्यचकित झाले.
सुलैमानाचा ओसाऱ्यात पतरसच भाषण
11जवा तो पतरस अन् योहानाला पकडून होता, तवा सगळे लोकं आश्चर्य करत त्या सुलैमानाच्या ओसाऱ्यात जो देवळाच्या आंगणात होता, त्यायच्यापासी पयत आले. 12हे पाऊन पतरसन लोकायले म्हतलं, हे इस्राएली लोकायनो तुमी या माणसावर कावून आश्चर्य करता, अन् तुमी आमच्या इकडे अशाप्रकारे कावून पायता, जसं कि आमीचं याले सामर्थ्याने अन् भक्तीने चालण्याच्या योग्य बनवलं हाय.? 13अब्राहाम इसहाक अन् याकोबाचा देव, आमच्या पूर्वजायचा देवानं आपल्या सेवक येशूचा गौरव केला, पण तुमी लोकायन त्याले मारून टाकण्यासाठी यहुदी लोकायच्या पुढाऱ्यायच्या ताब्यात देले, जवा पिलातुसने त्याले सोडून देण्याचा विचार केला, तवा तुमी त्याच्या समोर येशूचा तिरस्कार केला. 14तुमी येशूचा तिरस्कार केला, जो पवित्र अन् धर्मी होता, अन् विनंती केली कि तुमच्यासाठी एका खूण करणाऱ्याले सोडून देल्या जावे. 15अन् तुमी लोकायन “अनंत जीवन देणाऱ्याले” मारून टाकले, ज्याले देवानं मेलेल्यातून परत जिवंत केले, त्या गोष्टीचे आमी साक्षीदार हावो. 16या माणसाले ज्याले तुमी पायता, अन् ओयखता, ख्रिस्त येशूच्या नावात विश्वास केला. त्या विश्वासाच्या कारण, जे त्याच्या नावावर हाय त्याले सामर्थ्य देली हाय; अन् खरोखर त्याचं विश्वासाने जे येशूच्या पासून हाय, त्याले तुमी सगळ्याच्या समोर एकदमचं चांगले करून देले हाय. 17आता हे भावायनो, मले मालूम हाय कि, तुमी अन् तुमच्या पुढाऱ्यायन येशूले नासमजपणाने मारून टाकले, कावून कि तुमाले माईत नव्हत कि तो ख्रिस्त होता. 18पण ज्या गोष्टीले देवानं सगळ्या भविष्यवक्तायच्या व्दारे पयलेच सांगतल्या होत्या, कि ख्रिस्त दुख सोसून, मारून टाकल्या जाईन; येशूनं त्यायले खरं करून दाखवलं. 19म्हणून पापापासून पश्चाताप करा, अन् देवाकडे वडून या कि तुमचे पाप क्षमा केले जावे, तवा देवा कडून आत्मिक सामर्थ्याची वेळ येईन. 20अन् तो येशूला पाठवीन, जो ख्रिस्त हाय, ज्याले तुमच्यासाठी पयलेच नेमलं हाय. 21येशूले स्वर्गात त्या वेळेपरेंत रायने जरुरी हाय, जवा परेंत देव त्या सगळ्या वस्तुला नवीन बनून देईन, जे त्यानं निर्माण केली हाय, ज्याच्या बाऱ्यात पयलेच्या काठी देवाने आपल्या पवित्र भविष्यवक्तायच्या मुखातून बोलले हाय. 22जसं कि मोशेने म्हतलं, “प्रभू देव तुमच्या भावामध्ये तुमच्यासाठी माह्याल्या सारखा एक भविष्यवक्ता पाठवीन, जे काई तो तुमाले म्हणीन त्याचं आयकसान.” 23पण हरएक माणूस जो त्या भविष्यवक्त्याचे आयकणार नाई, तर तो लोकायतून नष्ट केला जाईन. 24अन् शमुवेल भविष्यवक्त्या पासून तर त्याच्या मांगच्या वाल्याई पर्यंत जेवळे भविष्यवक्ता बोलले त्या सगळ्यांनी त्या दिवसाच्या बद्दल सुवार्था सांगतली. 25तुमी सगळे भविष्यवक्त्यायचे लेकरं अन् त्या कराराचे भागी हा, जे देवाने तुमच्या पूर्वजाय संग बांधली होती, जवा त्याने अब्राहामाला म्हतलं, कि तुह्या पोरापासून पृथ्वीचे सगळे घराणे आशीर्वादित होऊन जातीन. 26देवानं आपल्या सेवाकाले मेलेल्यातून जिवंत करून सगळ्यात पयले तुमच्यापासी पाठवले, कि आपल्यातून हरएकाला आपल्या जीवनाच्या पापापासून देवाच्या इकडे वापस येण्यास मदत करावी.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in