YouVersion Logo
Search Icon

प्रेरितों के काम 4

4
पतरस अन् योहानाले बंदी करणे
1जवा पतरस अन् योहान लोकायले हे म्हणून रायले होते, तवा याजक अन् देवळाचे रक्षण करणारे सरदार अन् सदुकी पंथाचे लोकं त्यायच्यावर चढून आले. 2तवा त्या लोकायले खुपचं राग आला, कावून कि पतरस अन् योहान येशूच्या बाऱ्यात लोकायले शिकवत होते, कि जे लोकं मेले हायत देव त्यायले परत जिवंत करीन, जसं देवानं येशूला मेलेल्यातून परत जिवंत केलं हाय. 3त्यायनं त्यायले बंदी करून दुसऱ्या दिवसापरेंत जेलात ठेवले, कावून कि संध्याकाळ झाली होती. 4पण संदेश आयकणाऱ्या पैकी बऱ्याचं जनायनं येशूवर विश्वास केला, अन् त्यायची संख्या पाच हजार माणसाच्या जवळपास होती.
पतरस अन् योहान यहुदी सभेच्या समोर
5दुसऱ्या दिवशी त्यायचे यहुदी पुढारी अन् वडीलधारी अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक यरुशलेम शहरात एकाजागी एकत्र झाले होते. 6ते लोकं ज्यामध्ये महायाजक हन्ना अन् कैफा, अन् योहान अन् सिकंदर अन् जेवळे पण महायाजकाच्या घराण्याचे होते, सगळे एकत्र झाले. 7अन् पतरस अन् योहानाले मधात उभं करून विचारू लागले, “या माणसाले चांगलं करण्यासाठी तुमाले कोण सामर्थ अन् अधिकार देला हाय?” 8तवा पतरसने पवित्र आत्म्यात भरपूर हून यहुदी पुढाऱ्याले म्हतलं, 9“हे लोकायचे सरदारहो, अन् पुढारी लोकायनो, ह्या दुर्बल माणसाच्या संग जे भलाई झाली होती, जर आज आमाले या विषयी काई विचारपूस केली जात हाय, कि तो कसा काय चांगला झाला. 10तर तुमी सगळे अन् सारे इस्राएली लोकायनो, जाणून घ्या, कि नासरत नगरचा येशू ख्रिस्ताच्या नावाने ज्याले तुमी वधस्तंभावर चढवले, पण देवाने त्याले मेलेल्यातून परत जिवंत केलं, आज त्याचं येशूच्या नावाने हा माणूस तुमच्या समोर चांगला झाला हाय. 11ज्या गोट्याले राजमिस्त्रीयांनी निकम्मा ठरवलं होतं, तोच कोपऱ्याचा मुख्य गोटा झाला.” 12येशूच्या बिना कोण्या दुसऱ्या पासून तारण नाई, कावून कि, अभायाच्या खाली अन् माणसाईत दुसरं कोणत नाव नाई देल्या गेलं, ज्याच्या व्दारे आपण तारण प्राप्त करू शकतो.
येशूच्या शिष्यायले धमकी
13जवा त्यायनं पतरस अन् योहानाचे हिम्मत पायली, अन् हे जाणलं कि हे अडानी अन् साधे माणसं हायत, म्हणून आश्चर्यच केलं; मंग त्यायनं ओयखलं कि हे येशूच्या संग रायले हायत. 14पण जो माणूस चांगला झाला होता, तो पतरस योहाना संग उभा असलेला दिसला, म्हणून त्या पंथाचे लोकं त्यायच्या विरोधात काई म्हणू नाई शकले. 15पण त्यायले न्यायसभेच्या बायर जायाची आज्ञा देऊन, ते आप-आपसात विचार करून म्हणाले. 16“आपण या माणसायं संग काय करावं? कावून कि यरुशलेम शहराच्या सगळ्या रायणाऱ्यावर प्रगट हाय, कि त्याच्यावाल्या इकून अती एक मोठा चमत्कार दाखवल्या गेला हाय, अन् आपण त्याचा नकार नाई करू शकत. 17पण यासाठी कि, हे गोष्ट लोकाईत अजून पसरली नाई पायजे, म्हणून आपण त्यायले धमकाऊ कि ते येशूच्या नावाने कोण्यात्याही माणसा संग गोष्ट नाई करावं.” 18तवा पतरस अन् योहानाले बलावून अन् चेतावून म्हतलं, “कि येशूच्या नावाने काई पण बोलू नका अन् शिकवू नका.” 19पण पतरसन अन् योहानान त्यायले उत्तर देलं, “तुमीच न्याय करा, काय हे देवाच्या जवळ योग्य हाय कि, आमी देवाच्या गोष्टी पेक्षा तुमची गोष्ट मानावं? 20कावून कि, हे तर आमच्या पासून होऊ नाई शकत कि जे आमी पायले अन् आयकलं, ते नाई बोलावे” 21तवा त्यायनं त्यायले धमकावून सोडून देले, कावून कि लोकायमुळे त्यायले दंड देण्याचे काई कारण नाई सापडले, म्हणून जे घटना झाली होती, त्याच्या बद्दल सगळे लोकं देवाची स्तुती करू लागले. 22कावून कि जो माणूस चमत्कारिक पणे चांगला झाला होता, तो चाळीस वर्षा पेक्षा जास्त वयाचा होता.
शिष्यायची प्रार्थना
23पतरस अन् योहान सुटल्यानंतर आपल्या दोस्तायपासी आले, अन् जे काई मुख्ययाजक अन् यहुदी पुढाऱ्यायन त्यायले म्हतलं होतं, त्यायले सांगून देलं. 24हे आयकून त्यायनं, एकचित्त होऊन मोठ्या आवाजाने देवाले म्हतलं, “हे प्रभू, तू तोच हायस” ज्यानं अभाय अन् पृथ्वी अन् समुद्र अन् जे काई पण त्याच्यात हाय ते बनवलं हाय, 25अन् पवित्र आत्म्याच्या व्दारे आपला सेवक आमचा पूर्वज दाविद राजाच्या तोंडाने म्हतलं, अन्यजाती लोकं गोंधळ कावून घालतात? अन् देशा-देशायच्या लोकायन कावून व्यर्थ गोष्टीचा विचार केला? 26प्रभू अन् त्याच्या (अभिषिक्त) ख्रिस्त विरोधात पृथ्वीचे राजा उभे रायले, अन् अधिकारी एकी करून जमले. 27कावून कि खरोखर तुह्याले पवित्र सेवक येशूच्या विरोधात, ज्याले तू अभिषेक केला हाय, हेरोद राजा अन् पुन्तियुस पिलातुस अन्यजातीच्या अन् इस्राएली लोकायच्या सोबत त्या नगरात जमा झाले. 28त्यायनं तेच केलं, जे तुह्याल्या सामर्थ्याने अन् इच्छेने पयलेच पक्के केले होते, कि झालं पायजे. 29आता हे प्रभू त्यायच्या धमक्याले आयक, अन् आपल्या दासायले हे वरदान दे कि तुह्याले वचन मोठ्या हिम्मतीने सांगावे, 30अन् बरं करण्यासाठी तू आपला हात समोर कर, कि चिन्ह अन् चमत्काराचे काम तुह्याला पवित्र सेवक येशूच्या नावाने केल्या जावो. 31जवा त्यायची प्रार्थना झाली, तवा ते जागा जती ते जमा झाले होते, हालुन गेली अन् ते सगळे पवित्र आत्म्यान भरले अन् देवाच वचन मोठ्या हिम्मतीने सांगू लागले.
विश्वासी लोकायचे सहयोगी
32अन् विश्वास करणाऱ्यायची मंडळी एकचित्त अन् एका मनाचे होते, इथपरेंत कि कोणीहि आपली संपत्ती आपली मानत नाई होते, पण सगळं काई मिळून मिसळून होतं. 33अन् प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशू परत जिवंत होण्याविषयी साक्ष देत होते, अन् त्यायच्यावर मोठी कृपा झाली. 34अन् त्यायच्यात कोणीहि गरीब नव्हता, कावून कि ज्यायच्यापासी जमीन अन् घर होते, ते त्या वस्तुले इकून पैसे आणत होते. 35अन् प्रेषितायले देऊन देत होते, अन् जसं ज्यायले आवश्यक्ता असे त्यायच्या अनुसार प्रत्येकाले वाटून देत होते. 36योसेफ नावाचा एक माणूस होता, तो लैवी गोत्राचा होता जो साइप्रस टापूत रायणारा होता, प्रेषितायन त्याचं नाव बरनबास अर्थात शांतीचा पोरगा ठेवलं होतं. 37त्याची काई जमीन होती, त्यानं ते ईकली, अन् जे काई पैसे आले ते प्रेषितायच्या पासी आणून देले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in