YouVersion Logo
Search Icon

प्रेरितों के काम 2

2
पवित्र आत्माचे आगमन
1जवा यहुदी लोकायचा पिन्तेकुस्तचा सणाचा दिवस#2:1 पिन्तेकुस्तचा सणाचा दिवस पन्नासावा दिवस आला आला तवा ते सगळे एकाजागी जमा झाले होते. 2अन् एकाएक स्वर्गातून मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा शब्द आला, अन् त्या शब्दाने सारे घर जती ते बसले होते खूप घुमला. 3अन् त्यायले आगीच्या सारख्या जिभा अलग होतं असलेल्या दिसल्या, अन् त्यायच्यातून हरएकावर येऊन थांबल्या. 4अन् ते सगळे पवित्र आत्म्यात भरपूर झाले, अन् जसा-जसा आत्मा त्यायले बोल्याचं सामर्थ देत होता, तसे ते अलग-अलग भाषेत बोलायले लागले. 5अन् त्यावाक्ती देवाचा आदर करणारे लय यहुदी लोकं जे सगळ्या देशातून भागातून सण साजरा करायले आले होते, ते यरुशलेम शहरात रायत होते. 6जवा हवे सारखा आवाज आला, तवा गर्दी जमा होऊ लागली, तवा लोकं भेले, कावून कि हरेकाले हेच आयकू येत होते, कि हे माह्याली भाषा बोलत हायत. 7अन् ते सगळे हापचक होऊन म्हणू लागले, “आयका, हे जे बोलून रायले, काय ते सगळे गालील प्रांताचे लोकं नाई हायत? 8तर हे काय होतं हाय कि आपण आपल्या-आपल्या मायभूमीची भाषा बोलतांनी आयकून रायलो हाय. 9आपल्या मधून काई लोकं पारथी भागातले हायत, अन् मेदी अन् एलामी लोकं अन् मेसोपोटामिया प्रांत अन् यहुदीया प्रांत अन् कप्पूदुकिया अन् पुन्तुस अन् आशिया प्रांत, 10अन् फ्रूगिया प्रांताचे अन् पंफूलिया प्रांताचे अन् मिस्र देशाचे अन् कुरेणी शहराच्या जवळपास लीबीया देशातले काई भागातले सगळ्या देशाचे रायणारे अन् रोम शहरातून येणारे यहुदी यात्री 11काय यहुदी अन् काय अन्यजाती लोकं ज्यायनं यहुदी धर्माले स्वीकारलं होते, क्रेते टापूवर रायणारे लोकं अन् अरब देशात रायणारे लोकं, पण आपल्या-आपल्या भाषेमध्ये त्यायच्या बोलण्याने देवाच्या महिमेचे मोठंमोठ्या चमत्काराच्या बाऱ्यात आयकतं होते.” 12अन् ते सगळे हापचक हून अन् घाबरून एकादुसऱ्याले म्हणू, लागले “हे काय होऊ रायलं हाय?” 13पण दुसऱ्यायन मजाक करून म्हतलं, “हे तर दारूच्या नशेत हायत.”
पिन्तेकुस्तच्या दिवशी पतरसच भाषण
14तवा पतरस त्या अकरा प्रेषिता संग उभा झाला, अन् मोठ्याने त्यायले म्हणाला, हे यहुदीया प्रांतातले लोकायनो अन् हे यरुशलेम शहरात रायण्याऱ्या लोकायनो, हे तुमच्या लक्षात ठेवा, अन् माह्या बोलण्याकडे ध्यान द्या. 15जसे तुमी समजता, पण हे नशेत नाईत, कावून कि, आता तर सकाळचे नऊ वाजले हाय. 16जे आपल्या सोबत झाले हाय, हे त्या लिवलेल्या गोष्टी बद्दल हाय, जे योएल भविष्यवक्त्याच्या इकून पवित्रशास्त्रात सांगतल्या गेले हाय. 17देव म्हणतो, आखरीच्या दिवसात असं होईन, मी माह्याली आत्मा सगळ्या माणसायले देईन, अन् तुमचे पोरं अन् तुमच्या पोरी भविष्यवाणी करतीन, अन् तुमचे जवान दर्शन प्राप्त करतीन, अन् तुमचे बुढे माणसं स्वप्न पायतीन. 18त्या दिवसात मी माह्याल्या दास अन् दासीले आपला आत्मा देईन, अन् ते भविष्यवाणी करतीन. 19अन् मी अभायात अद्भभुत चिन्ह, अन् खाली जमिनीवर चिन्ह, म्हणजेच रक्ताचा अन् आगीचा अन् धुपटाचा ढग प्रगट करीन. 20प्रभूचा दिवस येण्याच्या पयले सुर्य अंधारमय होईन, अन् चंद्र रक्तासारखा लाल होईन, तो दिवस महान अन् प्रकाशमान दिवस अशीन. 21अन् जो कोणी प्रभूचे नाव घेईन, तोच तारण प्राप्त करीन. 22हे इस्राएल लोकायनो, या गोष्टी आयका, येशू नासरतवासी एक माणूस होता, ज्याचे देवाच्या इकून येण्याचे प्रमाण त्याची सामर्थ्याची काम अन् चमत्काराचे कामे अन् जो चिन्हां व्दारे प्रगट हाय, जे देवाने तुमच्यात त्याच्यापासून दाखविले जे तुमाले मालूम हाय. 23त्यालेच, जवा तो देवाच्या ठरवलेल्या योजना अन् पूर्व ज्ञानामुळे पकडल्या गेला, तवा तुमी अधर्मीयांच्या हाताने त्याला वधस्तंभावर चढवून मारून टाकलं. 24पण त्यालेच देवाने मरणाच्या बंधनातून सोडवून अजून जिवंत केलं, कावून कि त्याले मरणाच्या तावडीत राहावं हे शक्य नाई होते. 25कावून कि, दाविद राजा येशू ख्रिस्ताच्या बाऱ्यात म्हणतो, मी प्रभूले नेहमी माह्या समोर पायतं रायतो, कावून कि तो माह्या उजव्या बाजूने हाय, याकरिता कि मी त्या लोकायले भेऊ नये, जे मले नुकसान. पोहचतात. 26मी आनंदाने भरपूर झालो हाय, अन् मी तुह्याली स्तुती करत हावो, अन् माह्ये शरीर पण आशेत बनून राईन. 27कावून कि तू माह्या जीवाले मृत्युलोकात राऊ देणार नाई, अन् आपल्या पवित्र जनाच्या शवाले सडू नाई देशीन. 28तू मले जीवनाचा मार्ग सांगतला हायस, तू मले आपल्या उपस्थितिनं आनंदाने भरपूर करशीन. 29“हे भावायनो, मी त्या कुळपती राजा दाविद राजाच्या विषयात तुमाले हिम्मतीने सांगतो, कि तो तर मेला, अन् रोयल्या गेला, अन् त्याची कबर आजपरेंत आपल्यामध्ये हाय.” 30तो भविष्यवक्ता होता, त्याले मालूम होतं कि देवाने त्याच्या संग शपत खाऊन त्याले म्हतलं, “मी तुह्या खानदानीतून एकाला तुह्यावाल्या सिहासनावर बसविण.” 31पयलेच जाणून ख्रिस्ताच्या परत जिवंत होण्याच्या बाऱ्यात राजा दाविदाने भविष्यवाणी केली, कि तू मले मेलेला नाई राऊ देणार, अन् आपल्या पवित्र जनाच्या शवाले मृत्युलोकात सडू नाई देणार. 32याचं येशूले देवाने परत जिवंत केले, ज्याचे आपण सगळे साक्षी हावो. 33आता तो स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूनं उत्तम जागेवर बसलेला हाय, अन् देवबापाने जसा त्याले वायदा केला होता, त्याले पवित्र आत्मा देला अन् त्याने तो पवित्र आत्मा आपल्याले देला हाय, जसे तुमी आज पायता अन् आयकता. 34कावून कि, दाविद राजा तर स्वर्गावर नाई चढला हाय, पण तो स्वता म्हणतो, प्रभू देवान माह्या प्रभूले म्हतलं, माह्या उजव्या बाजूनं बस, 35जोपरेंत मी तुह्या वैऱ्याले, तुह्या नम्र करून त्यायले तुह्या पायाच्या खाली आसन करीन. 36म्हणून इस्राएल देशाच्या सगळ्या लोकायन या गोष्टीमुळे निश्चय जाणून घ्यावे, कि देवाने त्या येशूला ज्याला तुमी वधस्तंभावर चढवले हाय, त्याले प्रभू पण ठरले, अन् ख्रिस्त पण ठरवले हाय. 37जवा लोकायन हे आयकलं, तवा त्यायच्या अंतकरणाले टोचणी बसली, अन् ते पतरस अन् दुसऱ्या प्रेषितायले विचारू लागले, “हे भावायनो, आमी काय करावं?” 38तवा पतरसने त्यायले म्हतलं, पापांपासून पश्चाताप करा अन् तुमच्या पैकी हरएक आपल्या-आपल्या पापायच्या क्षमा करिता येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; तवा तुमाले पवित्र आत्म्याचे दान मिळणार. 39कावून कि हे प्रतिज्ञा तुमच्यासाठी, अन् तुमच्या लेकरायसाठी अन् त्या दूर दूरच्या लोकायसाठी हाय, ज्यायले आपला प्रभू आपला देव स्वताकडे बलावते. 40पतरसने बऱ्याचं गोष्टीचा बद्दल पुरावा देऊन त्यायले विनंती केली, कि आपल्या स्वताला त्या तेढ्या कुटिल अन् विपरीत पिढी पासून वाचवून ठेवा. 41जे काई पतरसन म्हतलं, ज्यायनं त्याच्या वचनावर विश्वास केला, त्यायनं बाप्तिस्मा घेतला, अन् त्याचं दिवशी विश्वासी लोकायच्या समुहामध्ये सुमारे तीन हजार लोकं जुडले.
विश्वासी लोकायचं जीवन
42अन् ते प्रेषिताय पासून शिकवण घेण्यास, अन् संगती ठेवण्यात, अन् ते विश्वासी एकमेकाय सोबत भाकरी खाण्यात, अन् प्रार्थना करण्यात मगन रायत होते. 43अन् त्याचं वाक्ती सगळे लोकं आदराने अन् भयाने भरून गेले, अन् बरेचं चमत्काराचे काम अन् चिन्ह प्रेषिताच्या व्दारे प्रगट होतं होते. 44अन् ते सगळे विश्वासी लोकं एकत्र रायत असतं, अन् त्यायच्या सगळ्या वस्तु मिळून मिसळून होत्या. 45अन् ते आपली-आपली धनसंपत्ती अन् वस्तु इकून मिळून मिसळून जशी-जशी ज्यायले गरज पडत होती देत असतं. 46अन् ते दररोज एकमनाने देवळात जमा होतं असतं, अन् ते घरोघरी भाकरी खाऊन आनंदाने अन् सरळ मनाने जेवण करत होते. 47अन् देवाची स्तुती करत असतं, अन् सगळे लोकं त्यायच्या संग आनंदाने रायत होते, अन् ज्यायचं तारण होतं होते, त्यायला दररोज प्रभू त्यायच्यात मिळवत होता.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in