प्रेरितों के काम 1
1
प्रस्तावना
1प्रिय थियूफिलूस, माह्याल्या पयल्या पुस्तकात मी तुमाले त्या सगळ्या गोष्टीच्या विषयात सांगतले हाय, ज्या येशूनं करणे अन् शिकवने सुरु केल्या. 2त्या दिवसापर्यंत जवा तो त्या प्रेषितायले ज्यायले त्याने निवडले होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज्ञा देऊन, देवाच्या व्दारे वरते स्वर्गात उचलल्या नाई गेला. 3अन् त्याने दुख सोसल्यावर मेल्यानंतर, बऱ्याचं पक्याप्रमाणाने आपल्या स्वताला जिवंत दाखविले, अन् चाळीस दिवसापर्यंत तो प्रेषितांना दिसत रायला, अन् देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगत रायला.
पवित्र आत्माची प्रतिज्ञा
4एकवेळी जवा तो शिष्यायच्या सोबत होता, तवा शिष्यायले भेटून त्यायले आज्ञा देली, “यरुशलेम शहराले सोडून जाऊ नका, पण त्या दानाची प्रतीक्षा करा, जे माह्याल्या देवानं तुमाले देण्याचा वादा केला होता, तुमी मले त्याच्या विषयात बोलतांना आयकलं होतं. 5कावून कि, योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने तर पाण्यात बाप्तिस्मा देला, पण थोड्यादिवसानंतर देव तुमच्या बरोबर रायण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविन.#1:5 तुमच्या बरोबर रायण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविन. तुमी पवित्र आत्म्याच्या व्दारे बाप्तिस्मा प्राप्त करणार” 6नंतर प्रेषित लोकं आणखी येशूले भेटले, तवा त्यायनं त्याले विचारलं, “हे प्रभू, काय तू इस्राएल देशाले स्वतंत्र करायले अन् आमचे राज्य परत स्थापित करायची तुह्याली वेळ आली हाय काय?” 7येशूनं शिष्यायले म्हतलं, “ती वेळ कधी येणार अन् ती घटना कधी होणार ते फक्त नियुक्त करायचा अधिकार माह्याल्या देवबापापासी हाय, हे तुमाले जाणण्याची गरज नाई. 8पण जवा पवित्र आत्मा तुमच्यावर येईन, तवा तुमाले पण सामर्थ भेटन, अन् यरुशलेम शहरात अन् सगळ्या यहुदीया प्रांतात अन् सगळ्या सामरीया प्रांतात अन् जगातल्या सगळ्या जागी लोकायले माह्याल्या बाऱ्यात साक्ष देसान.”
येशूच स्वर्गात जाणं
9असं म्हणून, त्यायच्या पासून पायता-पायता देवाने त्याले स्वर्गात उचलले अन् एका ढगाच्या कारण ते त्याले पाऊ शकले नाई. 10अन् तो जायाच्या वाक्ती जवा ते स्वर्गाकडे पायत होते, तवा एकदमचं दोन माणसं पांढरे कपडे घालून त्यायच्यापासी येऊन उभे रायले. 11अन् म्हणू लागले, हे गालील प्रांताच्या लोकायनो तुमी कावून उभे होऊन अभायाकडे पायता हाचं येशूले ज्याले देवानं तुमच्या पासून स्वर्गात उचलले हाय, अशाचं प्रकारे तो परत येणार, ज्या रीतीने तुमी त्याले स्वर्गात जातांनी पायलं.
एकत्रित प्रार्थना
12जवा देवदूत चालले गेले, तवा शिष्य जैतून नावाच्या पहाडापासी जे यरुशलेम शहराच्या आरामाच्या दिवसाच्या अंतरावर म्हणजे जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावर हाय, #1:12 एक किलोमीटरच्या अंतरावर हाय, आरामाच्या दिवसाच्या ततून यरुशलेम शहरात वापस आले. 13अन् जवा ते शहरात पोहचले, तवा ते त्या एका घराच्या माळीवरच्या खोलीत गेले, जती पतरस अन् योहान अन् याकोब अन् आंद्रियास अन् फिलिप्पुस अन् थोमा अन् बरतूलमाई अन् मत्तय अन् हल्फईचा पोरगा याकोब अन् शिमोन जेलोतेस अन् याकोबाचा पोरगा यहुदा रायत होते. 14ते सगळे शिष्य एकत्र होतं अन् त्या बाया पण ज्यायनं सेवा कार्यासाठी येशूची मदत केली होती, अन् येशूची माय मरिया त्यायच्या भावाय सोबत एकमनान व एकाचित्ताने प्रार्थना करण्यात मगन रायत होते.
एका नवीन प्रेषिताले निवडले
15अन् त्याचं दिवसात पतरस विश्वासी लोकाय मधून जे एकशे विस माणसं एकत्र होते, उभाहून सांगू लागला. 16“हे भावायनो, जरुरी होते कि पवित्रशास्त्राचा तो लेख पयलेचं पूर्ण व्हावा, जो पवित्र आत्म्यान दाविद राजाच्या तोंडातून यहुदा इस्कोरोतीच्या विषयात येशूले पकडणाऱ्याचा अगुवा होता. 17कावून कि, तो तर आमच्यातून एक होता अन् या सेवेमध्ये सहभागी झाला. 18जसं कि तुमाले मालूम हाय,#1:18 जसं कि तुमाले मालूम हाय, यहुदी पुढाऱ्यायन यहुदा इस्कोरोतीले पैसे देले होते, तवा त्याने येशूले चलाकीने पकडून देण्याचा वादा केला, नंतर यहूदाने ते पैसे त्यायले परत देल्यावर फासी घेतली त्याचं शरीर जमिनीवर पडले अन् त्याचे पोट फाटले अन् त्याचे सगळे आतळे बायर पडले, म्हणून त्या यहुदी पुढाऱ्यायन त्याचं पैशापासून एक वावर विकत घेतलं. 19अन् या सगळ्या गोष्टी यरुशलेम शहरातल्या रायनाऱ्या लोकायले मालूम झाल्या, अन् म्हणून त्या वावराचे नाव त्यायच्या भाषेत हकलदमा अर्थात-रक्ताचे वावर असे पडले. 20कावून कि दाविद राजा स्त्रोत्राच्या पुस्तकात लिवते कि त्याचे घर ओसाड पडीन, अन् त्यात कोणी पण रायणार नाई” अन् दाविद दुसऱ्या जागी हे पण लिवते, कि त्याचा अधिकार कोणी दुसरा घेवो. 21,22म्हणून हे जरुरी हाय, अशा माणसाले निवडल्या जावे, जो प्रभू येशूच्या कार्याचा सगळ्या वेळेचा साक्षी हाय. प्रभू येशूले योहान पासून बाप्तिस्मा देल्या पासून तर स्वर्गात स्वीकार केल्या गेल्या परेंत तो माणूस आपल्या संग प्रभू येशूच्या परत जिवंत होण्याच्या साक्षी बनावा. 23तवा त्यायनं सल्ला देला, एक योसेफाला जो बरसब्बास म्हणल्या जातो, ज्याचे दुसरे नाव युस्तूस हाय, दुसरे मत्तया ले. 24अन् हे म्हणून प्रार्थना केली, “हे प्रभू, तू जो सगळ्यायच्या मनाले जाणतो, हे प्रगट कर कि या दोघायतून कोणाची निवड केली हाय. 25जे याकरिता कि त्यानं सेवेची अन् प्रेषिताचे पद भरावे, ज्याले यहुदा इस्कोरोती सोडून आपल्या ठरवलेल्या जागी चालला गेला.” 26तवा त्यायनं त्यायच्या बाऱ्यात चिट्टी टाकली, अन् चिट्टी मत्तयाच्या नावाने निघाली, तवा तो त्या अकरा प्रेषितायच्या बरोबर गणल्या गेला.
Currently Selected:
प्रेरितों के काम 1: VAHNT
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.