युहन्ना 21
21
तीबिरीयास समुद्राच्या काटावर येशूचे दिसणे
1या गोष्टी नंतर येशूनं आपल्या स्वताले तीबिरीयास समुद्राच्या काठी शिष्यायवर प्रगट केलं, अन् हे अशाप्रकारे झालं. 2शिमोन पतरस अन् थोमा ज्याले दिदुमुस म्हतल्या जाते, अन् गालील प्रांताच्या काना गावातला नथनीयेल अन् जब्दीचा पोरगा, अन् येशूच्या शिष्यायतून दोघजन एकत्र जमले होते. 3शिमोन पतरस त्यायले म्हतलं, “मी मासोया पकळ्याले जाऊन रायलो.” त्यायनं त्याले म्हतलं, “आमी पण तुह्या संग येतो.” म्हणून ते लवकरच निघून डोंग्यावर चढले, पण त्यायनं त्या रात्री काहीच नाई पकडलं. 4दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळी येशू समुद्राच्या काटावर उभा रायला; तरी पण शिष्यायनं त्याले ओयखलं नाई कि हा येशू हाय. 5तवा येशूनं त्यायले म्हतलं, “हे माह्या दोस्तायनो, काय तुमच्यापासी काई खायाले हाय?” त्यायनं उत्तर देलं, “नाई.” 6येशूनं त्यायले म्हतलं, “डोंग्याच्या डाव्या बाजूनं जाळं टाका, तवा मिळतीन.” तवा त्यायनं जाळं टाकलं, अन् आता मासोया लय मिळाल्याने जाळे ओढू नाई शकले. 7म्हणून त्या शिष्यान ज्याच्यावर येशू प्रेम करत होता, पतरसले म्हतलं, “हा तर प्रभू हाय.” शिमोन पतरसन हे आयकून कि प्रभू हाय, तवा त्यानं आपले कपडे घातले होते, ते त्यानं काम करताने काढून ठेवले. कावून कि तो कपडे घालून नव्हता म्हणून पाण्यात उडी मारली. 8पण दुसरे शिष्य डोंग्यावर मासोयान भरलेलं जाळं ओढत आले, कावून कि ते काटाच्या ज्यास्त दूर नव्हते, पण फक्त दोनशे हात (जवळपास शंभर मीटर दूर होते) दूर होते. 9जवा ते काटावर उतरले, तवा त्यायनं कोयशाचा इस्तव, अन् त्याचावर मासोई ठेवलेली अन् भाकरी पायली. 10येशूनं त्यायले म्हतलं, “ज्या मासोया तुमी आता पकडल्या हाय, त्याच्यातून काई आणा.” 11तवा शिमोन पतरसन डोंग्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या मासोयान भरलेलं जाळं काटावर ओडला, अन् एवठ्या मासोया असून पण जाळं नाई फाटलं. 12येशूनं त्यायले म्हतलं, “या, जेवण करा.” अन् शिष्यायतून कोणाले हिम्मत नाई झाली, कि येशूले विचाराव, “तू कोण हाय?” कावून कि त्यायले मालूम होतं कि हा प्रभू हाय. 13येशूनं भाकर घेतली अन् शिष्यायले देली, अन् तसाच मासोया पण देल्या. 14हे तिसऱ्या वेळी होतं, कि येशू मेलेल्यातून जिवंत झाल्यावर शिष्यायले दिसला.
येशूचे पतरस संग बोलणे
15जेवण झाल्यावर येशूनं शिमोन पतरसले विचारलं, “हे योहानाच्या#21:15 योहानाच्या मत्तय 16:17 योहान 1:42; 2:15; 21:16-17, हा पतरसचा बाप हाय पोरा, शिमोन काय तू खरचं जेवढे दुसरे शिष्य माह्यावर प्रेम करते, तू त्यायच्याहून जास्त मले प्रेम करते?” पतरसन येशूले म्हतलं, “हो प्रभू; तुले तर माईत हाय, कि मी तुले प्रेम करतो.” येशूनं त्याले म्हतलं, माह्या शिष्यायची कायजी अशी कर जसं कि ते मेंढरे हाय. 16येशूनं मंग दुसऱ्यांदा पतरसले म्हतलं, “हे योहानाच्या पोरा, शिमोन काय तू खरचं जेवढे दुसरे शिष्य माह्यावर प्रेम करते, तू त्यायच्याहून जास्त मले प्रेम करते?” पतरसन येशूले म्हतलं, “हो प्रभू; तुले तर माईत हाय, कि मी तुले प्रेम करतो.” येशूनं त्याले म्हतलं, “माह्या शिष्यायची कायजी अशी कर जसं कि ते मेंढरं हाय.” 17येशूनं तिसऱ्यांदा पतरसले विचारलं, “हे योहानाच्या पोरा, शिमोन काय तू खरचं जेवढे दुसरे शिष्य माह्यावर प्रेम करते, तू त्यायच्याहून जास्त मले प्रेम करते?” पतरस उदास झाला, कि येशूनं तिसऱ्यांदा असं म्हतलं, “काय तू माह्यावर प्रेम करते?” अन् त्यानं येशूले म्हतलं, “होय प्रभू, तुले तर सगळं मालूम हाय: तुले तर हे मालूम हाय कि मी तुह्यावर प्रेम करतो.” येशूनं त्याले म्हतलं, “माह्या मेंढरायची कायजी घे. 18मी तुले खरं-खरं सांगतो, जवा तू जवान होता, आपले कपडे घालून जती पायजे तती फिरत होता; जवा तू बुढा होशीन, तवा आपले हाताले पसरवशिन, अन् कोणी तुले बांधून टाकीन अन् तुले तती घेऊन जातीन, जती तुले जायचं नाई.” 19येशूनं असं सांग्यासाठी म्हतलं, कि पतरस कसा मरीन, अन् देवाचा गौरव करीन; अन् हे म्हणून, त्याले म्हतलं, “माह्या शिष्य बनून, माह्य अनुकरण करत राय.”
येशू अन् त्याच्या आवडता शिष्य
20पतरस मांग फिरला अन् त्या शिष्याले मागे येतांना पायलं, ज्याच्यावर येशू प्रेम करत होता, अन् ज्याने जेवणाच्या वाक्ती, त्याच्या जवळ जाऊन विचारलं होतं, “हे प्रभू, तुह्या पकडणारा कोण हाय?” 21त्याले पाऊन पतरसन येशूले म्हतलं, “हे प्रभू, याच्या सोबत काय होईन?” 22येशूनं त्याले म्हतलं, “जर माह्यी इच्छा हाय, कि तो माह्या वापस येण्यापरेंत जिवंत राहावा, तर तुले त्याचं काय? तू माह्या शिष्य बनून माह्याल अनुकरण करत राय.” 23म्हणून दुसऱ्या शिष्यायमध्ये हे गोष्ट पसरली, कि तो दुसरा शिष्य नाई मरणार; तरी पण येशूनं त्याले हे नाई सांगतल, कि तो नाई मरणार, पण हे कि “जर मले वाटते कि हा माह्या वापस येण्यापरेंत जिवंत राईन, तर तुले याचं काय?”
समाप्ती
24तो हाचं शिष्य हाय, जो ह्या गोष्टीची साक्ष देत हाय, अन् ज्याने या गोष्टीले लिवलं हाय, अन् आमाले मालूम हाय, कि त्याची साक्ष खरी हाय. 25येशूनं आणखी खूप सारे काम केले, जर एक-एक करून त्या सगळ्या कामाचं वर्णन केलं असतं तर, मले वाटते कि जे पुस्तक लिवल्या गेली असती, ती जगभरात पण मावली नसती.
Currently Selected:
युहन्ना 21: VAHNT
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.