YouVersion लोगो
सर्च आयकॉन

द कॉलनमुना

द कॉल

3 पैकी 3 दिवस

मी कोठे सुरूवात करावी?

तुम्हाला जे करायला आवडते त्यापासून सुरुवात करूया.

तुम्हाला कोणत्या गुणकौशल्याचा आशीर्वाद मिळाला आहे?

तुम्ही चांगले स्वयंपाकी आहा का? तुम्ही लिहू किंवा वाचू शकता का? तुम्ही चांगले फोटो काढू शकता? तुम्ही लोकांशी चांगले संबंध ठेवता का? तुम्ही चांगले श्रोते आहा का? तुम्ही मुलांसोबत चांगले वागता का? तुम्ही चांगले व्हिडिओ काढता का? घर स्वच्छ कसे ठेवायचे हे तुम्हाला माहित आहे का?

तुम्हाला जे करायला आवडते त्यापासून सुरुवात करा.

तुम्हाला जे करायला आवडते ते अधिक करा.

तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी ते करा.

ते प्रेमाने करा.

आणि तुम्ही ते उत्कृष्टतेने करा, जणूकाही देवासाठी करीत आहा.

पाचारणाचे उत्तर मुळीच काही न करून पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जेथे आहात तेथून त्याची सुरुवात होते.

जेव्हा तुम्ही तुमच्या कृपादानांनी आणि कलागुणांनी लोकांची सेवा करता तेव्हा लोकांना त्यांच्यावर प्रीति केल्यासारखे वाटते; लक्षात ठेवा प्रेम कधीच विफल होत नाही!

छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या काळजीपूर्वक करण्यापासून त्याची सुरुवात होते. अगदी लहान कृतीदेखील, देवाचे प्रेम तेथे आढळू शकते.

पण फक्त निष्क्रिय बसून राहू नका; तुमच्याजवळ जे आहे त्याने सुरुवात करा. आणि जसजसा तुम्ही देवासोबत अधिक वेळ घालवाल, तो तुम्हाला स्पष्ट दिशा दाखवील.

तो तुम्हाला मार्ग दाखवील आणि रात्रभर आणि दिवसभर तो तुमचे मार्गदर्शन करील.

तुमच्या हातात सध्या काय आहे?

त्याला पाच भाकरी आणि दोन मासे द्या किंवा त्याला फक्त ते रिकामे हात द्या.

पण कुठेतरी सुरुवात करा...

“कारण हे सर्व शून्यापासून सुरू होते आणि ते तुमच्यापासून सुरू होते!

शास्त्रवाचन:

पवित्र शास्त्र

दिवस 2

या योजनेविषयी

द कॉल

कॉल ही बायबल योजना आहे जी झिरो कॉन येथे जन्माला आली. हा 3 दिवसांचा प्रवास आहे जो देवाच्या पाचारणाला उत्तर देण्यावर केंद्रित आहे आणि ख्रिस्ताच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व ओळखून, आणि आपल्या कृपादानांचा आणि कलागुणांचा उपयोग करून इतरांची उत्तम सेवा करण्यासाठी, आपण जेथे आहोत तेथून सुरूवात करून त्याचे प्रेम ऑनलाइन आणि ऑफलाइन जगात सामायिक करा.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/