YouVersion लोगो
सर्च आयकॉन

द कॉलनमुना

द कॉल

3 पैकी 2 दिवस

पण मी का?

“शरीराला” मजबूत आणि निकोप होण्यासाठी प्रत्येक अवयवाची - एकमेकांची - गरज भासते.

ख्रिस्ताचे शरीर; चर्च, विविध प्रकारची कृपादाने लाभलेल्या विविध लोकांपासून बनलेले आहे, यासाठी की चर्च हे “चर्च” असावे..

आपण एकमेकांना सहाय्य आणि संरक्षण दिले पाहिजे.

मंडळीचा अर्थात चर्चचा कोणताही भाग स्वतःहून योग्यप्रकारे काम करू शकत नाही. तुमची भूमिका कितीही क्षुल्लक असली तरी ती शत्रूची लबाडी आहे कारण प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे.

तुम्ही महत्वाचे आहात!

पायाची बोटे नसलेल्या शरीराची किंवा हात नसलेल्या शरीराची कल्पना करा.

किंवा त्याहूनही वाईट, फक्त कान असलेल्या शरीराची कल्पना करा... आता ते भयावह दृश्य आहे!

तुम्ही कदाचित म्हणाल, “पण शरीर तरीही दातांशिवाय आणि काही बोटांशिवाय कार्य करू शकते.”

पण तुम्हीच सांगा, पायाचे बोट किंवा दात संपूर्ण शरीरावाचून काय करणार?

तुम्ही दुसऱ्या अवयवाला असेही म्हणू शकत नाही की “तू फारसा मौल्यवान नाहीस, म्हणून आम्हाला तुझी गरज नाही.” कारण सत्य हे आहे की, “आम्हाला वाटते” जे अवयव कमी महत्वाचे आहेत त्यांना देव मोठा आदर देतो. ते जे काही करतात ते मोठ्या नम्रतेने करतात म्हणून त्यांना आदर मिळतो.

पूर्णतेने कार्य करण्यासाठी आपल्याला संपूर्ण शरीराची गरज आहे.

मुख्य म्हणजे चर्चमधील सर्व लोक मोठ्या उद्देशासाठी एकत्र काम करतात - त्याच्या प्रेमाची सुवार्ता सांगण्यासाठी. आम्ही नेहमी तितकेच सुसज्ज नसतो, परंतु आम्ही पाचारणासाठी तितकेच वचनबद्ध असले पाहिजे, देवाने आम्हाला दिलेल्या कृपादानांद्वारे आणि कलागुणांद्वारे आम्ही शक्य तितकी मदत केली पाहिजे.

प्रत्येक अवयव उत्तमप्रकारे घडविला गेला होता आणि प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे.

तुम्ही महत्वाचे आहा.

आम्ही अनेक अवयवांसह एक शरीर आहोत, परंतु आमचे एकच ध्येय आहे - त्याचे राज्य येताना पाहणे!

ये, प्रभु येशू, ये!

पवित्र शास्त्र

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

द कॉल

कॉल ही बायबल योजना आहे जी झिरो कॉन येथे जन्माला आली. हा 3 दिवसांचा प्रवास आहे जो देवाच्या पाचारणाला उत्तर देण्यावर केंद्रित आहे आणि ख्रिस्ताच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व ओळखून, आणि आपल्या कृपादानांचा आणि कलागुणांचा उपयोग करून इतरांची उत्तम सेवा करण्यासाठी, आपण जेथे आहोत तेथून सुरूवात करून त्याचे प्रेम ऑनलाइन आणि ऑफलाइन जगात सामायिक करा.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Zero चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.zerocon.in/