तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय!नमुना
“आपल्या सर्वांना तारणहाराची गरज आहे”
जेव्हा देवाने आदाम आणि हव्वा यांची निर्मिती केली, तेव्हा त्याने त्यांना पापविरहित आणि त्याच्याशी परिपूर्ण नातेसंबंधात घडवले. जेव्हा त्यांनी उत्पत्तिच्या तिसऱ्या अध्यायात देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले, तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनात आणि संपूर्ण मानवजातीवर पाप आणले. रोम. ३:२३ मध्ये आदाम आणि हव्वा यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम सांगितले आहेत.
“कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” रोम ३:२३
पाप आणि त्याच्या परिणामापासून कोणीही मुक्त नाही; आपल्यापैकी प्रत्येकजण दोषी आहे. परिणामी आपण सर्व जण देवापासून वेगळे झालो आहोत. आपल्या पापाचा सार्वकालिक परिणामही होतो.
“कारण पापाचे वेतन मरण आहे.” रोम ६:२३ अ
आदाम आणि हव्वा यांनी देवाची आज्ञा न पाळण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सर्व वंशजांना (मानव जातीला) शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या मृत्यू अटळ झाला. त्यांच्या अपयशानंतर, देवाला एक निर्णय घ्यावा लागला: पापास मानवजातीबरोबर त्याची धाव पूर्ण करू देणे., परिणामी मानवजातीचा नाश होणे किंवा मानवजातीला पापाच्या तावडीतून वाचवण्याचे साधन प्रदान करणे. सुदैवाने, त्याच्या प्रेमाची आणि कृपेची अंतिम अभिव्यक्ती म्हणून, देवाने त्याच्या पुत्राद्वारे तारणाचे साधन प्रदान केले.
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” योहान ३:१६
“पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” रोम ६:२३ ब
येशू ख्रिस्तावाचून मानवजातीला शारीरिक आणि आत्मिक अशा दोन्ही प्रकारच्या मृत्यूला सामोरे जावे लागणे अगत्याचे आहे ; याला अपवाद नाही. परंतु आपल्यापैकी जे ख्रिस्तात आहेत त्यांच्यासाठी भौतिक मृत्यू अजूनही आमची वाट पाहत आहे, परंतु आत्मिक मृत्यू (नरक) नाही. उलट आपण या पृथ्वीवरून गेल्यानंतर स्वर्गातील सार्वकालिक जीवन आपली वाट पाहत आहे. येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण बलिदानाद्वारे आणि त्याचे मेलेल्यांतून पुनरुत्थान होण्याद्वारे, आपण पापाच्या आध्यात्मिक दंडापासून वाचतो!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
आयुष्यातील बहुतांश निर्णय कशासाठी तरी महत्त्वाचे असतात. मात्र, एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही या असामान्य निर्णयाच्या म्हणजेच देवाची तारणाची मुक्त देणगीच्या सखोल आकलनासाठी एक सोपा मार्गदर्शक शोधत असाल तर येथून प्रारंभ करा. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr