तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय!नमुना
"देवाने तुम्हाला अनंतकाळाविषयीच्या कल्पनेसह उत्पन्न केले आहे."
जेव्हा देवाने आपल्याला निर्माण केले, तेव्हा त्याच्याकडे आपल्या अस्तित्वासाठी ७० किंवा ८० वर्षांपेक्षा जास्त वर्षांची योजना होती. आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी त्याचा एक विशिष्ट हेतू आहे. त्याच्या योजनेत आमचे सांसारिक जीवन आणि आपले स्वर्गीय (किंवा सार्वकालिक) जीवन या दोहोंचा समावेश आहे. याकोब ४:१४ आपल्या अस्तित्वाच्या या दोन पैलूंमधील फरक सांगते. त्यात म्हटले आहे की,
“तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.” याकोब ४:१४
"जीवन लहान आहे" ही म्हण तुम्ही ऐकली असेल. सार्वकालिकतेच्या प्रकाशात, ते लहान आहे! पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे.” इब्री ९:२७
आपण सर्व जण शारीरिक मृत्यूच्या अधीन आहोत. परंतु भौतिक मृत्यू म्हणजे केवळ आपल्या भौतिक शरीराचा अंत आहे, आपल्या आत्म्याचा नाही. आपला आत्मा किंवा आपल्या शरीरात राहणारे आपले चेतन अस्तित्व शाश्वत आहे. आपला आत्मा आपल्या शारीरिक मृत्यूनंतर दोनपैकी एका ठिकाणी अनंतकाळ घालवेल: स्वर्ग किंवा नरक.
स्वर्ग हा शाश्वत/सार्वकालिक सुखलोक आहे जिथे देव राहतो. नरक म्हणजे देवापासून पूर्णपणे विभक्त होणे.
या जगात आपला नैसर्गिक जन्म ही केवळ पृथ्वीवरील आपल्या तात्पुरत्या,
भौतिक जीवनाची सुरुवात नव्हती, तर अनंतकाळच्या इथपर्यंतच्या आपल्या आध्यात्मिक जीवनाची ही सुरुवात होती. त्यामुळे अनंतकाळाच्या प्रकाशात काहींना आपले सांसारिक जीवन नगण्य वाटू शकते, पण हे खरे नाही. तुमचे शाश्वत/सार्वकालिक भवितव्य खरे तर पृथ्वीवरच्या काळात तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असते; सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू बनविण्याचा निर्णय. येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या सर्वांसाठी तारण उपलब्ध आहे, आणि केवळ त्याच्याद्वारेच आपण आपले भवितव्य देवापासून वेगळे राहण्यापासून स्वर्गात देवाबरोबर अनंतकाळ घालविण्यापर्यंत बदलू शकतो. येशू म्हणाला,
“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” योहान १४:६
आपण आपल्या पृथ्वीवरील जीवनात जे निर्णय घेतो ते इतर कारणांसाठीदेखील महत्त्वाचे असतात. विश्वासणारे म्हणून आपण ज्या प्रकारे जगतो त्याचा परिणाम इतरांच्या सार्वकालिक भवितव्यावर होऊ शकतो जे अद्याप येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून ओळखत नाहीत. दररोज, आपल्या सभोवतालचे लोक ख्रिस्तासाठी जगण्याचे आपले उदाहरण पाहत आहेत. ख्रिस्ती म्हणून, देव आपल्यापैकी प्रत्येकाचा उपयोग आपल्या सभोवतालच्या लोकांना स्वर्गात आणण्यासाठी करतो जे अद्याप त्याला ओळखत नाहीत. येशू म्हणाला,
“तुम्ही जगाचा प्रकाश आहात; . . . तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.” मत्तय ५:१४-१६
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
आयुष्यातील बहुतांश निर्णय कशासाठी तरी महत्त्वाचे असतात. मात्र, एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जर तुम्ही या असामान्य निर्णयाच्या म्हणजेच देवाची तारणाची मुक्त देणगीच्या सखोल आकलनासाठी एक सोपा मार्गदर्शक शोधत असाल तर येथून प्रारंभ करा. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr