चिंतेला तिच्या स्वतःच्या खेळात पराभूत करणेनमुना
द्वि-गुणात्मक दृष्टीकोन
न्यू लिविंग ट्रांसलेशन मध्ये फिलिप्पैकरांस पत्र ह्याच्या 4 अध्याय वचन 6 अशा प्रकारे भाषांतरित केल्या गेलं आहे “कशाचीही चिंता करू नका, प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा”
किती सरळ आणि थेट आज्ञा आहे, यात कोणतीही अस्पष्टता नाही. तरीही त्याचे अनुसरण करणे इतके कठीण का आहे? चिंतेचा संघर्ष असा आहे की यामुळे आपल्या अंतःकरण आणि मन धावू लागतात - म्हणजे आपण काय विचार आणि प्रक्रिया करतो ती आपल्या वर्तमान परिस्थितीच्या गरजेपेक्षा जास्त असते. म्हणूनच प्रेषित पौलाने फिलिप्पैकरांना त्याच अध्यायातील 8 व्या वचनात असे लिहिले आहे की त्यांनी सत्य, आदरणीय, व न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय व श्रवणीय अशा गोष्टींवर मनन केले पाहिजे. एका समाविष्ट संतृप्त जगात राहण्यासाठी आपल्याला खरोखर आवश्यक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले मन स्थिर करणे आवश्यक आहे आणि गरज असल्यास आपले विचार गाळणे सुद्धा. आपले विचार गाळणे म्हणजे हेतुपुरस्सर आणि निर्लज्जपणे त्या नकारात्मक, भीतीदायक आणि चिंताजनक विचारांना बाहेर ढकलणे आणि सत्य, सन्मान आणि शुद्धतेच्या विचारांनी बदलणे आहे. परंतु येथे आव्हान आहे – अदलाबदल करणे इतके सरळ सोपे नाही. आपल्याला नकारात्मक विचार शोधण्यासाठी आणि त्यांना आनंदी विचारांसह बदलण्यासाठी संगणकांसारखे प्रोग्राम केलेले नाही. मग पुढे जाण्याचा मार्ग काय आहे? ह्याचा काही उपाय आहे का? होय आणि त्याची सुरुवात स्तुतीद्वारे होते. यासाठी हे आवश्यक आहे की आपण आपल्या विचारांच्या भोवऱ्यातून बाहेर पडून तो कोण आहे, त्याने काय केले आहे, त्याने आपल्याला जे वचन दिले आहे आणि आपल्यावर असलेल्या त्याच्या निरंतर प्रेमाबद्दल देवाची स्तुती करण्यास सुरवात करावी. स्तुती करणे आपले लक्ष मुद्दाम आपल्यापासून काढून देवावर लावणे आहे. स्तुती एका जड आणि निराशापूर्ण वातावरणाला एका आशेने आणि आनंदाने भरलेल्या वातावरणात बदलते. स्तुती आपण त्यांना अनुमती दिलेल्या सर्व अस्वास्थ्यकर विकल्पांना विस्थापित करते आणि आपल्या आयुष्याच्या सिंहासनावर देवाला परत बसविते.
स्तुती नंतर प्रार्थना केली जाते जेव्हा आपण कालच्या वाचनात सांगितल्या प्रमाणे त्या गोष्टी देतो. ही प्रार्थना म्हणजे एका सर्वसमर्थ देवाला आपल्या चिंतेचे पूर्ण समर्पण करणे. तो सर्व शक्तिशाली, सर्व काही जाणणारा आणि सर्वत्र एकाच वेळी असणारा आहे. आपल्या चिंतेचे ओझे देण्यासाठी या भव्य तारणहारापेक्षा इतर कोण योग्य आहे? एखाद्या चिंतेच्या घटनेच्या क्षणी, चिंतांना थेट प्रार्थनेत रुपांतरित करणे महत्वाचे आहे. देव खरोखरच आपली भीती हाताळू शकतो. पवित्र आत्म्याला आपला सल्लागार म्हणून संबोधले जाते कारण प्रार्थनेच्या वेळी तो आपल्याला दिलासा देईल आणि आपल्या वचनाने आपल्याला सल्ला देईल. आपल्या विचारांच्या विपरीत, आपण एकटे नाही, आपण मदतीपलीकडे नाही आणि आपले भावनिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा आपण आपली मने व अंतःकरणे स्तुती प्रशंसा आणि प्रार्थनेसह नव्यासारखे करतो तेव्हा आपण त्या प्रशंसनीय, स्तुति योग्य आणि सत्य विचारांना आपल्या आत्म्याला धुवून आपल्या आतून आपले नूतनीकरण करण्याची परवांगी देतो. चिंतेशी लढण्यासाठी आपण या दोन बाजूंच्या दृष्टिकोनासाठी आणि तो आला तेथे त्याला बांधून परत पाठविण्यासाठी तयार आहात काय?
प्रार्थनाः
प्रिय प्रभू,
काळाची सुरुवात होण्याआधी पासून माझ्यावर प्रेम करणारा विश्वासू देव असल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. माझ्यासाठी जीव देण्यासाठी आपला एकुलता एक पुत्र येशू पाठविण्याबद्दल धन्यवाद. माझ्या विषयी कधीही हार न मानल्याबद्दल धन्यवाद. मी तुला मागतो की तू माझ्या चिंतेवर विजय मिळविण्यास माझी मदत कर आणि माझ्या आयुष्यात आणि आयुष्याद्वारे तुझे गौरव तू करून घे.
मी तुझ्यावर प्रेम करतो बापा.
येशूच्या नावात
आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
चिंता तिच्या सर्व प्रकारांद्वारे आपल्याला दुर्बल करणारी अशी ठरू शकते. कारण ती आपले संतुलन घालवू शकते आणि आपल्याला भीतीमध्ये बांधून ठेवू शकते. हा कथेचा शेवट नाही, कारण येशूमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आणि संघर्षावर मात करण्याची कृपा मिळते. आपण त्यावर केवळ मात करू शकत नाही, परंतु आपण त्यासाठी अधिक चांगले केले जाऊ शकतो देवाच्या वचनाचे आणि आश्वसन देणाऱ्या त्याच्या सतत उपस्थितीसाठी त्याचे आभार.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही आरई झिऑनचे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. https://www.wearezion.co/bible-plan