चिंतेला तिच्या स्वतःच्या खेळात पराभूत करणेनमुना
तिला बाहेर बोलवा
आपण सहजपणे काळजी करणारी एखादी व्यक्ती आहात काय? आपल्याला अगदी अयोग्य वेळी भीतीची झटके येतात काय जे आपल्याला एकाच जागी खिळून ठेवितात किंवा काहीही हालचाल करू देत नाही? आपल्याला अनेकदा तणावग्रस्त वाटते काय आणि आपण अनेकदा आपली शांतता गमावता काय?
आपण चिंताग्रस्त होता हे कबूल करणे ठीक आहे. या त्रासाचा अर्धा भाग या प्रकाराशी संबंधित काळिमा आणि ही वस्तुस्थिती आहे की आपल्याला असे वाटते की आपण कशातून जात आहे हे आपण लपविले पाहिजे. जेव्हा आपण या अदृश्य परंतु अगदी वास्तविक शत्रूशी लढत आहोत याबद्दल देवाशी, स्वतःशी आणि आपल्या विश्वासू मित्रांशी मुक्तपणे बोलतो तेव्हा आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेतो. जेव्हा आपल्याला बंदिवान ठेवणाऱ्या गोष्टीला आपण अंधारातून बाहेर प्रकाशात बोलावितो तेव्हा ती गोष्ट त्याची शक्ती गमावते. प्रकाशात आपण ज्या गोष्टीबरोबर आपण लढत आहोत ती गोष्ट स्पष्टपणे पाहू शकतो आणि आपण त्या गोष्टीकडे जितके लक्ष देत आहोत तितके लक्ष दिले पाहिजे किंवा नाही हे देखील प्रमाणित करू शकतो. आपल्या चिंता आपल्या आयुष्यातील अगदी वास्तविक आणि त्रासदायक घटनांवर किंवा कल्पित किंवा असमंजसपणाच्या भीतींवर आधारित असू शकतात. जेव्हा हे कबूल करतो की आपण या गोष्टीसह संघर्ष करीत आहोत, तेव्हा ही चिंता कशामुळे उद्भवू शकते याकडे आपण लक्ष देऊ शकतो आणि आपल्या त्या देवासमोर आपली सर्व काळजी टाकू शकतो जो आपल्याला आपले सर्व ओझे त्याच्यावर टाकण्यास सांगतो. त्यास कबूल करणे आणि संबोधित करणे, चिंता ह्याच्याशी संबंधित चिंता आणि अपराधीपणाची भावना कमी करते ज्याद्वारे आपण आपल्याला सर्वात चांगल्या रीतीने ओळखणाऱ्या, आपल्या निर्माणकर्त्या कडून मदत मिळविण्यास सक्षम करते. आपण ज्या भावनांचा सामना करीत आहोत त्यामध्ये देवाला आणल्याने, त्याच्या शब्दाद्वारे आणि त्याच्याशी सतत संभाषणाद्वारे आपल्याला आपल्या परिस्थितीबद्दल अधिक स्पष्टता जाणवू लागते. हे कदाचित आपल्या प्रश्नांची उत्तरे असू शकत नाही. परंतु ती शांत शांतता आणि तुम्हाला सामर्थ्य देणारी शक्ती असेल. देवाशी आपला संबंध सुरू होताच आपल्याला समजेल की देवाला देव असू देण्यासाठी आणि आपण आपण असण्यासाठी नियंत्रणात असण्याची आवश्यकता वाटणाऱ्या भावनेचा त्याग करणे आवश्यक आहे. हे देवाला सोपविणे ही जीवनात एकदाच होणारी गोष्ट नाही तर एक नियमित शिस्त आहे, कधीकधी अगदी दररोज घडणाऱ्या गोष्टी देखील आहेत. आपण देवावर विश्वास ठेऊ शकता की तो आपल्या सावर्गीय पित्याप्रमाणे न्याय आणि कठोरता न दाखविता, प्रेमाने आणि सौम्यतेने आपली काळजी घेईल. त्याऐवजी तो आपण त्याच्या जवळ जाण्याची आतुरतेने वाट पाहतो, जेणेकरून आपण त्याच्या आलिंग्यात आराम करू शकाल आणि आपल्या अंतःकरणाची प्रत्येक चिंतेबद्दल त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. त्याची अशी इच्छा आहे की आपणास अडचणीत आणणाऱ्या चिंतेपासून आपल्याला मुक्तता मिळावी आणि आपण अमर्याद आनंद, शांतता आणि विश्रांतीने परिपूर्ण जीवन जगावे. देव आपल्या उपचार आणि उद्धारासाठी खोलवर गुंतवणूक करतो म्हणून आपण त्याला बंद करु नये. ख्रिस्त आपल्याला देतो त्या धैर्याने आपण आज आणि दररोज आपल्या चिंताग्रस्त डोक्याचा सामना कराल काय आणि मग ते हाताळण्यासाठी नम्रपणे त्याला त्याच्या स्वाधीन कराल काय?
प्रार्थनाः
प्रिय प्रभू,
मी कबूल करतो की मी _____________ च्या क्षेत्रात चिंताग्रस्त आहे. मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुझ्यापेक्षा अधिक माझ्या भीतीला घट्ट धरण्याबद्दल माझी तू क्षमा कर. मला तुझ्या जवळ असण्याची आवश्यकता आहे आणि मी तुला ही काळजी देतो. मी माझा हा भार उचलण्याची तुला विनंती करतो. वधस्तंभावर तुझ्या मुलाच्या पूर्ण झालेल्या कार्याबद्दल धन्यवाद, ज्यातून माझी चिंता एकदाच आणि नेहमीसाठी खिळल्या गेली आहे. मला स्वातंत्र्याने जगण्यास आणि तू मला दिलेल्या जीवनाचा आनंद घेण्यास माझी मदत कर.
येशूच्या नावात
आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
चिंता तिच्या सर्व प्रकारांद्वारे आपल्याला दुर्बल करणारी अशी ठरू शकते. कारण ती आपले संतुलन घालवू शकते आणि आपल्याला भीतीमध्ये बांधून ठेवू शकते. हा कथेचा शेवट नाही, कारण येशूमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आणि संघर्षावर मात करण्याची कृपा मिळते. आपण त्यावर केवळ मात करू शकत नाही, परंतु आपण त्यासाठी अधिक चांगले केले जाऊ शकतो देवाच्या वचनाचे आणि आश्वसन देणाऱ्या त्याच्या सतत उपस्थितीसाठी त्याचे आभार.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही आरई झिऑनचे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. https://www.wearezion.co/bible-plan