ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकानमुना
अनेक ज्यूंना त्यांच्या मसीहाविषयी विशिष्ट अपेक्षा होती. त्यांना शिकवले गेले होते की त्यांचा विश्वसनीय राजा सत्तेत येईल आणि रोमन जुलुमापासून वाचवेल. त्यामुळे जेव्हा येशू अवतरला, समाजातील बहिष्कृतांना एकत्र करण्यास सुरुवात केली आणि ईश्वराच्या राज्याची नम्रपणे घोषणा केली. तो मसीहा आहे हे काही जण ओळखू शकले नाहीत आणि हिंसक रीतीने त्याच्या नियमांना विरोध केला. गंमतीची गोष्ट अशी की, येशूचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ज्या ईश्वराचे साधन होते त्याला त्यांचा विरोध होता, आणि वधस्तंभ, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण, यांच्या माध्यमातून, येशू स्वर्गात सत्तेच्या गादीवर ज्यू आणि इतर देशांचा राजा म्हणून बसला. नंतरच्या भागामध्ये, ल्यूक आपल्याला ह्या संदेशाचा थेस्सलोनिका, बेरिया आणि अथेन्स इथे उपदेश करण्याचा पॉलचा अनुभव सांगतो.
थेस्सलोनिकामध्ये असताना, पॉलने हिब्रू शास्त्र वचनांमधून दाखवून दिले की, प्रेषितांनी नेहमीच सांगितले आहे की मसीहाला राजा म्हणून राज्य करण्यासाठी दुःख भोगून पुन्हा वर उठणे आवश्यक होते. येशू या प्राचीन प्रेषितांच्या वर्णनामध्ये बसतो हे पॉलने दाखवून दिले, आणि आणि पुष्कळ लोकांना त्याची खात्री पटली. जसे पॉलचे श्रोते वाढत होते, काही मत्सर करणाऱ्या ज्यूंनी संपूर्ण जगामध्ये उलथापालथ केल्याबद्दल आणि नवीन शासनकर्त्याची घोषणा केल्याबद्दलचा आरोप करण्यासाठी काही प्रभावकर्त्यांना फितवले. रोमन वसाहतींना आपल्या शासनकर्त्याला नाराज करायचे नव्हते, त्यामुळे हा खूप गंभीर आरोप होता की पॉलला मारले जाऊ शकत होते. पॉलला येशूच्या राज्याच्या शुभ वार्तेचा उपदेश देण्यासाठी थेस्सलनीक मधून बाहेर बेरिया शहरामध्ये पाठवले. दरम्यान तिथे पॉलला काही पुरुष आणि स्त्रिया भेटल्या जे ऐकून, शिकून, आणि खात्री करून घेण्यासाठी उत्सुक होते की त्याचा संदेश हा हिब्रू शास्त्र वचनांशी जुळतो आहे. बीरियामधील बऱ्याच जणांनी येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली होती, पण थेस्सलोनिका मधील काही जण प्रवास करत बीरियामधूनही त्याला बाहेर काढून टाकण्यासाठी आले आणि पॉलचे कार्य अर्धवट राहिले. याची परिणीती पॉल अथेन्समध्ये जाण्यामध्ये झाली, जिथे तो कल्पनांच्या मुख्य बाजारपेठेमध्ये त्यांच्या ""अदृश्य ईश्वराविषयी""खरी ओळख आणि येशूच्या पुररूध्दाराचे महत्व सांगण्यासाठी आला होता.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com