YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 32 दिवस

पॉलच्या संपूर्ण रोमन साम्राज्यातील धर्मप्रचाराच्या प्रवासाबद्दल ल्यूक आपल्याला सतत सांगतोय. जसा तो प्रवास करत होता, येशूच्या साम्राज्यविषयीची शुभ वार्ता तो धैर्याने सांगत होता आणि बऱ्याच जणांना पॉलचा हा संदेश त्यांच्या रोमन पद्धतीने आयुष्य जगण्याला धोका वाटत होता. पण अशीही इतर माणसे होती ज्यांनी अखेरीस पॉलचा संदेश हा आपले आयुष्य नव्या पद्धतीने जगण्याची शुभ वार्ता आहे हे ओळखले होते. उदाहरणार्थ, फिलिप्पी मधील जेलरबद्दल ल्यूक आपल्याला सांगतो. पॉल आणि सिलास यांच्या चुकीच्या कारावासाबद्दल बघत असताना आपण त्यांना भेटलो आहोत.



संपूर्ण शहरभर गोंधळाचे वातावरण केल्याबद्दल आरोपी ठरवल्यानंतर, पॉल आणि त्याचा सहकर्मी सिलास यांना नाहक मारून तुरुंगात टाकले होते. त्यांच्या कोठडीत जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेले असताना, त्यांनी ईश्वराची प्रार्थना आणि गाणे गायला सुरुवात केली. कैदी त्यांच्या ईश्वराच्या आराधनेची गाणी ऐकत होते तेव्हा एक इतका भयानक भूकंपाचा मोठा झटका बसला की, कैद्यांच्या साखळ्या तुटल्या आणि तुरुंगाचे दरवाजे वाऱ्याने उघडले. जेलरने हे पहिले आणि त्याला माहित होते की कैद्यांच्या अशा सुटकेमुळे त्याला मृत्युदंड दिला जाऊ शकतो, त्यामुळे जीवनात नैराश्य येऊन, तो स्वतःवरच त्याची तलवार उगारतो.  पण त्याच वेळी त्याचे आयुष्य वाचविण्यासाठी पॉल त्याला थांबवतो. यावर, कठोर जेलर हळवा होतो आणि पॉल आणि सिलास समोर नतमस्तक होतो. तो ओळखतो की, त्याचे आयुष्य अनंत काळासाठी वाचणे गरजेचे आहे, आणि त्याला मार्ग जाणून घ्यायचा असतो. पॉल आणि सिलास हा मार्ग त्याच्याबरोबर सामायिक करण्यासाठी उत्सुक असतात आणि त्या दिवसापासून जेलर आणि त्याचे कुटुंब येशूचे अनुसरण करायला सुरुवात करतात. 


पवित्र शास्त्र

दिवस 31दिवस 33

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com