YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 21 दिवस

ल्यूक हा येशूचे आयुष्य, मृत्यू , पुनरुद्धार, आणि उत्थान, या अगदी सुरुवातीच्या भागांचा लेखक आहे , आम्ही या भागांना, ल्यूकचे गॉस्पेल असे म्हणतो. पण ल्यूकचे दुसरे खंडही आहेत हे तुम्हाला माहित आहे का? आपण त्यांना एक्ट्सचे पुस्तक असे म्हणतो. वृद्धिंगत झालेल्या येशूने त्याचे कार्य सुरु ठेवले आहे आणि तो स्वर्गात गेल्यानंतरही त्याच्या लोकांमधील पवित्र आत्म्यातून शिकवण देतो याबद्दल हे आहे. 


ल्यूक या एक्ट्सची सुरुवात शिष्य आणि वृद्धिंगत झालेल्या येशू यांच्या भेटीपासून करतो.  अनेक आठवडे, येशूने  त्यांच्या अपसाइड डाऊन किंगडमविषयी शिकवण देणे आणि  नव निर्मिती म्हणजे त्याने त्याच्या मृत्यू आणि पुनरुद्धाराच्या माध्यमातून सुरु ठेवले. शिष्यांना जायचे होते आणि त्याच्या शिकवणीचा प्रसार करायचा होता, पण जो पर्यंत त्यांना नवीन शक्ती मिळत नाही तोपर्यंत येशूने त्यांना थांबायला सांगितले, जेणेकरून येशूच्या राज्याविषयी गरज असलेला विश्वास त्यांच्यापाशी येईल त्यांचे हे कार्य जेरुसलेममध्ये सुरु होऊन, नंतर ज्युडिया आणि शोमरोन इथे पसरेल, आणि त्यानंतर सर्व देशांमध्ये पसरले जाईल.  


एक्ट्सच्या या पुस्तकाचा मुख्य विषय आणि त्याची रचना ही सुरुवाच्या अध्यायापासून याच दिशेने आहे. येशूने त्याच्या आत्म्यातून सर्व देशांना त्यांच्या राज्यात प्रेम आणि स्वातंत्र्यामध्ये राहण्यासाठी आमंत्रित केल्याची ही गोष्ट आहे. पहिले सात भाग हे कशाप्रकारे जेरुसलेममध्ये या प्रसाराची सुरुवात झाली हे दाखविणारे आहेत.  नंतरचे चार भाग हे ज्युडिया आणि शोमरोन यांच्या ज्यू नसलेल्या शेजारच्या प्रदेशांमध्ये कशा पद्धतीने हा संदेश पसरला हे सांगणारे आहेत. १३ व्या भागानंतर, जगातील इतर सर्व देशांमध्ये येशूच्या राज्याची शुभ वार्ता कशा पद्धतीने पसरण्यास सुरुवात झाली हे ल्यूक आपल्याला सांगतो. 


दिवस 20दिवस 22

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com