YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 87:1-7

स्तोत्रसंहिता 87:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे. हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच. सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील. गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”

स्तोत्रसंहिता 87:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला. याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा, सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे. परमेश्वराच्या नगरी, तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला “मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ” खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल, “हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे, आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.” नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील: “याचा जन्म सीयोनात झाला आहे.” सेला संगीत समारंभात ते गातील, “माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.”

स्तोत्रसंहिता 87:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे. याकोबाच्या सर्व वसतिस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत. हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात; (सेला) राहाब व बाबेल मला ओळखतात असे मी विदित करीन; पाहा, पलेशेथ, सोर व कूश म्हणतात, ह्याचा जन्म तेथलाच. सीयोनेविषयी म्हणतील की, हा आणि तो तिच्यातच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. लोकांची नावनिशी करताना ह्याचा जन्म तेथलाच, असे परमेश्वर लिहील. (सेला) गायन व नृत्य करणारे म्हणतील : “माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.”