YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 87

87
स्तोत्र 87
कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. एक गीत.
1त्यांनी पवित्र पर्वतावर त्यांच्या नगरीचा पाया घातला.
2याकोबाच्या सर्व नगरांपेक्षा,
सीयोनाचे व्दार याहवेहला अधिक प्रिय आहे.
3परमेश्वराच्या नगरी,
तुझ्याबद्दल या उत्कृष्ट गोष्टी कथन होतात: सेला
4“मी नोंद करेन की, राहाब#87:4 इजिप्तसाठी काव्यातील नाव आणि बाबिलोन
हे देश माझे अस्तित्व मान्य करतात—
पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात—
ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”
5खरोखर, त्या दिवसात सीयोनाबाबत म्हटले जाईल,
“हा आणि तो सीयोनात जन्मलेला आहे,
आणि प्रत्यक्ष देवाधिदेव या शहराला प्रस्थापित करतील.”
6नागरिकांच्या नोंदवहीत याहवेह लिहितील:
“याचा जन्म सीयोनात झाला आहे.” सेला
7संगीत समारंभात ते गातील,
“माझे सर्व झरे तुमच्यामध्येच आहेत.”

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 87: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन