स्तोत्रसंहिता 87
87
सीयोनेत राहण्याचा मान
कोरहपुत्रांचे संगीतस्तोत्र.
1परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.
2याकोबाच्या सर्व वसतिस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत.
3हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात;
(सेला)
4राहाब व बाबेल मला ओळखतात असे मी विदित करीन; पाहा, पलेशेथ, सोर व कूश म्हणतात, ह्याचा जन्म तेथलाच.
5सीयोनेविषयी म्हणतील की, हा आणि तो तिच्यातच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
6लोकांची नावनिशी करताना ह्याचा जन्म तेथलाच, असे परमेश्वर लिहील.
(सेला)
7गायन व नृत्य करणारे म्हणतील : “माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 87: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.