YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 86

86
देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना
दाविदाची प्रार्थना.
1हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे; मी दीन व दरिद्री आहे.
2माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणार्‍या सेवकाचे तारण कर.
3हे प्रभू, माझ्यावर कृपा कर; कारण मी दिवसभर तुझा धावा करतो.
4हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर; मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो.
5हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.
6हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या काकळुतीच्या वाणीकडे लक्ष दे.
7मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.
8हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.
9हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.
10कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.
11हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
12हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णन करीन.
13कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.
14हे देवा, उन्मत्त लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत, जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घेण्यास पाहत आहे; ते तुला जुमानत नाहीत.
15तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.
16तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर.
17हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की, तू माझे साहाय्य व समाधान केले आहेस, हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 86: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन