परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे. हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच. सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील. गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”
स्तोत्र. 87 वाचा
ऐका स्तोत्र. 87
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: स्तोत्र. 87:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ