स्तोत्रसंहिता 81:13-16
स्तोत्रसंहिता 81:13-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल! मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन. परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील. ते सर्वकाळ अपमानीत राहतील. मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन; मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.
स्तोत्रसंहिता 81:13-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते, जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर, मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता, आणि त्याच्या विरोधकांवर माझ्या हाताचा प्रहार केला असता! जे याहवेहचा तिरस्कार करतात, ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती. मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते; तुला डोंगरातील उत्कृष्ट मधाने मी तुला तृप्त केले असते.”
स्तोत्रसंहिता 81:13-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझे लोक माझे ऐकतील, इस्राएल माझ्या मार्गांनी चालेल, तर बरे होईल! मी तेव्हाच त्यांच्या वैर्यांचा मोड करीन, त्यांच्या शत्रूंवर मी आपला हात चालवीन; परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील, आणि ते सतत धाकात राहतील2 मी त्याला गव्हाचे सत्त्व खाऊ घालीन आणि पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन.”